बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण कोणताही माई का लाल रद्द करू शकत नाही; सीएम शिंदेंचा कॉंग्रेसवर हल्लाबोल

  • Written By: Published:
बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण कोणताही माई का लाल रद्द करू शकत नाही; सीएम शिंदेंचा कॉंग्रेसवर हल्लाबोल

Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणावरुन (Reservation) चांगलचं वातावरण तापलं. त्यातच विरोधी पक्षनेते राहुल गांधींन (Rahul Gandhi) अमेरिका दौऱ्यात आरक्षणबद्दल कथित वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जातेय. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

Ek Daav Bhootacha : एक डाव भुताचा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, स्मशानात जन्मलेल्या तरुणाचा रंजक प्रवास 

काही लोक परदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहे. पण, हे आरक्षण कोणताही माई का लाल रद्द करू शकत नाही, असं त्यांनी म्हटललं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज वर्धा येथे पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, काही जण परदेशात जाऊन देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहेत. मात्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण कुणालाही रद्द करता येणार नाही. जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आहेत, तोपर्यंत कोणताही माईका लाल आरक्षण रद्द करू शकत नाही, असं सीएम शिंदेंनी ठणकावलं.

काँग्रेसने ओबीसींना कधीच पुढे जाऊ दिले नाही, मोदींचा गंभीर आरोप; मविआवरही साधला निशाणा 

शिंदे म्हणाले, काही लोक जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्याचा दावा करत आहेत. असे करून ते दहशतवाद्यांच्या सूरात सूर मिसळवत आहे. हे कलम हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये मोठा विकास झाला. त्यांना हा विकास थांबवायचा आहे का? मोदींनी सामान्य माणसाला सशक्त करून त्यांचा सन्मान वाढवण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळेच त्यांनी वन नेशन वन इलेक्शनची योजना आणली आहे.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, 21 वे शतक हे भारताचे आहे. मोदी हे या देशाचे कर्णधार आहेत. त्यांनी देशातील महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला. गेल्या 10 वर्षात सुमारे 10 कोटी महिला स्वावलंबी झाल्या आहेत. आज अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना सुरू झाली असून, यासाठी महिलांना 25 लाखांचे अर्थसहाय्य केलं जातं. 1 हजार महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विभाग सुरू केला जात आहे. पीएम मित्र टेक्सटाईल पार्कचीही सुरूवात होत आहे. या पार्कमध्ये सुमारे दोन लाख रोजगार निर्माण होणार आहेत. यामुळे परिसराचा संपूर्ण कायापालट होईल.

काय म्हणाले होते राहुल गांधी?
देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील, तेव्हा काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणण्याच्या मुद्द्यावर विचार करेन. पण सध्या भारतात तशी परिस्थिती नाही. तुम्ही आर्थिक आकडेवारी पाहता तेव्हा ही बाब प्रकर्षाने जाणवते. सद्य स्थितीत आदिवासींना 100 रुपयांपैकी केवळ 10 पैसे मिळतात. दलितांना 100 रुपयांपैकी फक्त 5 रुपये मिळतात. ओबीसींनाही जवळपास समान वाटा मिळतो, असं राहुल गांधी म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube