PM Modi यांच्यावरील अविश्वास ठरावातून विरोधक स्वतःचेच ‘वस्त्रहरण’करताय; एकनाथ शिंदेंचं टीकास्त्र
Motion Of No Confidence Pm Modi : देशभरात विश्वास गमावलेल्या विरोधी पक्षाने संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडलाय. खरं तर या ठरावावर चर्चा घडवून विरोधक स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत. विरोधकांच्या पंतप्रधान मोदींवरील (Prime Minister Narendra Modi) अविश्वास ठरावावरून अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ( CM Eknath Shinde Criticize Opposition on Motion Of No Confidence Pm Modi )
कैद्यांच्या पुनर्वसनासाठी ‘येरवड्या’चा भारी उपक्रम
मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. लोकसभेत त्यावर चर्चा सुरू झाली आहे. त्यात बुधावारी राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मणिपूरच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) जोरदार हल्लाबोल केला. त्याला भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah) यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर देत काँग्रेसवर तुफान हल्ला चढविला. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
देवदर्शनासाठी चाललेल्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात तिघे जागीच ठार
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
विरोधकांच्या पंतप्रधान मोदींवरील (Prime Minister Narendra Modi) अविश्वास ठरावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘देशभरात विश्वास गमावलेल्या विरोधी पक्षाने संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडलाय. खरं तर या ठरावावर चर्चा घडवून विरोधक स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास आणि सुधारणांचा धडाका लावलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. कॉंग्रेसच्या 55-60 वर्षांच्या कालखंडात जेवढी विकासकामे झाली नाहीत, त्यापेक्षा अधिक विकास गेल्या 9 वर्षांत झाला आहे. जगभरात पंतप्रधानांच्या नेतृत्वाला जी मान्यता मिळत आहे, ती पाहून विरोधकांचा जळफळाट झाला आहे.’
देशभरात विश्वास गमावलेल्या विरोधी पक्षाने संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडलाय. खरं तर या ठरावावर चर्चा घडवून विरोधक स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास आणि सुधारणांचा धडाका लावलेला…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 10, 2023
‘देशातील जनतेने विरोधकांवर वारंवार अविश्वास दाखवलाय. 2014 आणि 2019 मध्ये सामान्य नागरिकांचा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यावरील प्रगाढ विश्वास दिसून आला. 2024 साली तो वृद्धिंगत होईल, याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही. भारताच्या नागरिकांना आता फक्त सर्वांगीण प्रगती आणि आर्थिक विकास हवा आहे. एकमेकांचे हात हाती घेऊन ऐक्याच्या घोषणा देणारे आणि पायात पाय घालून पाडण्याची संधी शोधणारे विरोधक आता कालबाह्य झाले आहेत. ते अविश्वास ठरावावर तोंडावर कसे आपटतात, हे गेल्या दोन दिवसांपासून सारा देश पाहतोय. पंतप्रधानांचे आणि एनडीएच्या घटक पक्षांचे स्थान या चर्चेनंतर अधिक बळकट होईल, यात मला तीळमात्र शंका वाटत नाही.’ असं शिंदेंनी ट्विट करत म्हंटलं आहे.