जयदीप आपटे संघाचा माणूस, त्याला मूर्तीकलेचा कोणताही अनुभव नाही; पटोलेंचा आरोप

जयदीप आपटे संघाचा माणूस, त्याला मूर्तीकलेचा कोणताही अनुभव नाही; पटोलेंचा आरोप

Nana Patole : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळळ्याच्या घटनेवरून चांगलचं रान पेटलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) सरकारवर टीकेची झोड उठवत हा पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (Rashtriya Swayamsevak Sangh)माणूस असल्याचा आरोप केला. राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा ब्राँन्झचा होता. पण त्याच्या डोक्याजवळच्या भागात कापूस अन् कागद आढळल्याचा दावा त्यांनी केला.

Bigg Boss Marathi : अभिजीत गुरुंनी सांगितलेली ‘बिग बॉस मराठी’ची व्याख्या तुम्ही ऐकली का? 

नाना पटोले यांनी गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, सरकारने राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा उभारण्याची घाई केली, ही बाब निदर्शनास येत आहेतच. सांस्कृतिक संचालनालयाकडून पुतळा प्रमाणित करायला हवा होता. तो केला गेला नाही. कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा संघाचा माणूस आहे. त्याला मुर्तीकलेचा कोणताही अनुभव नव्हता. त्यानंतरही त्याला कोणत्या आधारावर छत्रपतींचा पुतळा उभारण्याचे काम देण्यात आले? अशा माणसाला काम देण्याचं कारणं काय? महाराजांचा अपमान करण्याचे त्याची हिम्मत कशी झाली? असे सवाल पटोलेंनी केली.

निवडणुकीपूर्वी सौनिक जाणार अन् चहल येणार; ‘लाडक्या’ अधिकाऱ्यासाठी शिंदेंची धडपड? 

शिवरायांचा पुतळा ब्रॉन्झ धातूचा पण त्याच्या डोक्यात कापूस व कागद असल्याचे निदर्शनास आले आहे, असंही पटोले म्हणाले.

पुढं ते म्हणाले, अवघ्या 8 महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यासाठी शिल्ककार व आर्किटेक्ट नव्हे तर राज्य सरकार जबाबदार आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण असो की राजकोटमधील पुतळा कोसळण्याची घटना असो, या सर्वांना देवेंद्र फडणवीस राजकारण म्हणून पाहतात. हा राजकारण नव्हे तर आस्थेचा प्रश्न आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावं. या कमिशनखोरीला कोणते राजकारण म्हणायचे? असा सवाल पटोलेंनी केला.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube