‘आम्ही कधीही सहन करणार नाही’; काका-पुतण्यांना पटोलेंचा पटोलेंचा सूचक इशारा

‘आम्ही कधीही सहन करणार नाही’; काका-पुतण्यांना पटोलेंचा पटोलेंचा सूचक इशारा

Nana Patole : पुण्यात काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गुप्त बैठक झाली. उद्योजक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर ही भेट झाली. काका-पुतण्याच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचा उरलेला गटही सत्तेत सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान, आता या भेटीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सुचक इशारा दिला आहे. मविआ बाबत गैरसमज निर्माण होईल, अशी बाब आम्ही कधीही सहन करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. (congress leader nana patole on sharad pawar and ajit pawar meeting)

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीबाबत जनतेच्या मनात संभ्रम आहे. असा संभ्रम पुन्हा होता कामा नये, याबाबत स्पष्टता यावी, अशी चर्चा उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. आम्ही दोघांनी निर्णय घेतला आहे की, जनचेच्या मनात महाविकास आघाडीबाबत गैरसमज निर्माण होईल, अशी बाब आम्ही कधीही सहन करणार नाही.

Mahesh Elkunchwar : ‘वर्षातून एकदाच साहित्य संमेलनावर २-३ कोटी खर्च करणं चुकीचं, त्यापेक्षा….’ 

शरद पवार-अजित पवार भेटीमुळे महाविकास आघाडीला धोका आहे का? असं विचारलं असता पटोल म्हणाले, लोकशाहीत जनता ही सर्वात महत्त्वाची असते. जेव्हा आम्ही मित्रपक्ष म्हणून एकत्र काम करतो तेव्हा लोक आम्हाला त्याच दृष्टीने पाहत असतात. मात्र शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. आम्ही दोघे (नाना पटोले आणि उद्धव ठाकरे) असे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेत आहोत. आम्ही या विषयावर चर्चा केली. संबंधित भेटीबाबत स्पष्टता यावी, शरद पवारांनी त्यांची बाजू स्पष्ट करावी, अशी आमची भूमिका आहे. कारण पवारांच्या भूमिकेमुळं महाविकास आघाडीला फटका बसू शकतो. शरद पवारांच्या भूमिकेबाबत आम्ही चिंता व्यक्त केल्याचं पटोले म्हणाले.

दरम्यान, दीड महिन्यापूर्वीच अजित पवार यांनी सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी झाले. यानंतर आता शरद पवार- अजित पवार यांच्यात भेट झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान, आज शरद पवारांनी मी कदापी भाजपसोबत जाणार नाही, असं स्पष्ट केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube