Yogesh Beldar : मुख्यमंत्र्यांवर पुन्हा टीका केली तर चांगलाच धडा शिकवू, राऊतांना इशारा

Yogesh Beldar : मुख्यमंत्र्यांवर पुन्हा टीका केली तर चांगलाच धडा शिकवू, राऊतांना इशारा

नाशिक : शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गट व शिंदे गटातील तणाव वाढतच चालला आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath shinde ) यांच्यावर बोलतांना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होत. आता याच प्रकरणावरून राऊतांवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच तक्रारदार नाशिकमधील शिंदे गटाचे पदाधिकारी योगेश बेलदार ( Yogesh Beldar ) यांनी राऊत यांना इशारा दिला आहे. पुन्हा जर मुख्यमंत्र्यांवर टीका केली तर चांगलाच धडा शिकवला जाईल असा इशारा बेलदार यांनी राऊत यांना दिला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. राऊत यांच्याविरोधात शिंदे गटाचे योगेश बेलदार यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

यावेळी योगेश बेलदार म्हणाले, संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचं श्रद्धास्थान आहे. संजय राऊत यांना उत्तर द्यायचं नाही असं नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा टीका केली तर तुम्हाला शिवसेना स्टाईलमध्येच उत्तर देऊ. तसेच संजय राऊतांना चांगलाच धडा देखील शिकवला जाईल व पुन्हा नाशिक मध्ये फिरू देणार नाही असा दमही योगेश बेलदार यांनी दिला आहे.

अमित शाह नेमकं काय म्हणाले होते?
पुणे दौऱ्यावर असतांना अमित शाह म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या लालसेपोटी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे तळवे चाटायला गेले होते पण निवडणूक आयोगाने दूध का दूध पानी का पानी केले आहे. असे शाह यांनी विधान केले होते.

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, ‘या’ प्रकरणी झाला गुन्हा दाखल

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?
राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केलं. हे लोक काय चाटत आहेत. ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. चाटूगिरीचं ढोंग आहे. टोकाची चाटूगिरी सुरू आहे. ज्यांची चाटली जातेय ते आम्हाला न्याय देत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube