‘मला काकांमुळे MBBS पदवी मिळालेली नाही’; कोल्हेंचाही अजितदादांवर पलटवार
Amol Kolhe On Ajit Pawar : माझा काका डॉक्टर होता म्हणून मला MBBS ची डिग्री मिळाली नाही, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पलटवार केला आहे. दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघावरुन वातावरण तापलेलं असतानाच आज शिवाजीराव आढळराव पाटलांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. शिरुरच्या जागेवरुन अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात चांगलीच घमासान सुरु आहे. आढळरावांच्या पक्षप्रवेशावेळी अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर सडकून टीका केली. याच टीकेला अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आणखी एक काँग्रेसीला CM शिंदे आयात करणार? संजय निरुपम शिवसेनेच्या वाटेवर
अमोल कोल्हे म्हणाले, मी डॉक्टर आणि कलाकार माझ्या स्वत:च्या हिमतीवर झालो आहे. माझा काका डॉक्टर होता म्हणून मला एमबीबीएस पदवी मिळालेली नाही. माझा राजकारणाचा पिंडा आहे की नाही हे ठरवणारे तुम्ही कोण आहात.. माझं नाव कोणत्याही भ्रष्टाचारात नाही म्हणजे माझा राजकारणाचा पिंडा नाही का? सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीने राजकारणात यायचं नाही का? राजकारणाच्या पिंडाचा शिक्का मारेणारे तुम्ही कोण आहात? या शब्दांत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
होळीच्या दिवशीही ‘योद्धा’चा व्यवसाय मंदावला, दुसऱ्या सोमवारी खात्यात केली इतकी कमाई
तसेच ज्या मतदारसंघाने माझ्यावर विश्वास ठेऊन मला निवडून दिले त्या मतदारसंघाचे प्रश्न संसदेत पोटतिडकीने मांडताना सर्वजण मला मागील पाच वर्षांपासून पाहत आहेत. ससंदेत केलेल्या कामामुळे कोणत्याही कलाकार खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे असा एकतरी कलाकार मला दाखवावा, जर मला तीनवेळा हा पुरस्कार मिळाला आहे, तर तुम्ही का इन्कार करीत आहात? महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना तुम्ही अशोक सराफांना दिला, त्यांनी वेगळी भूमिका घेतली की तुम्ही तेच म्हणणार का? असा सवालही अमोल कोल्हे यांनी अजितदादांना केला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार असल्याचं अजितदादांनी जाहीरपणे सांगितलं आहे. तसेच तुम्ही गहाळ बसू नका, कामाला लागा, समोरचा उमेदवार कामाला लागलायं. तो डॉयलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे. डायलॉबाजी करणं चित्रपट, मालिकेत ठिक आहे. जनतेसमोर घाम गाळावा लागतो, काम करावं लागतं, घाम गाळण्याची ताकद शिवाजीरावांमध्ये असल्याचं अजित पवार यांनी कोल्हेंवर रोख धरुन म्हटलं आहे.