‘कोणीही मायचा लाल असला तरी सोडणार नाही’; ड्रग्ज प्रकरणावर अजितदादांचं मोठं विधान

‘कोणीही मायचा लाल असला तरी सोडणार नाही’; ड्रग्ज प्रकरणावर अजितदादांचं मोठं विधान

Ajit Pawar Speak On Drugs Case : राज्यात ड्रग्ज प्रकरणी पोलिसांकडून अनेक मोठ-मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. पुणे पोलिसांकडून 3500 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी संदीप धुनिया (Sandip Dhuniya) नामक आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. त्यावरुनच बोलताना अजित पवारांनी (Ajit pawar) ड्रग्जप्रकरणी कोणत्याही मायच्या लालला सोडणार नसल्याचा थेट इशाराचा अजितदादांनी दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित राज्यव्यापी संविधान गौरव सभेत अजित पवार बोलत होते.

PM मोदींचा मास्टरस्ट्रोक! भाजपने साधले महाराष्ट्र, UP अन् कर्नाटकमधील लोकसभेच्या 100 जागांचे गणित

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, देशात आज ड्रग्ज रॅकेट मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. यातून नवी पिढी बेचिराख करण्याचा अधिकार कोणाला दिलेला नाही. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना याचे धागेदोरे शोधण्याच्या सूचना केल्या आहे. कोणीही मायचा लाल असला तरी त्याला सोडायचे नाही. अशा आरोपींना थेट फाशीची शिक्षा दिली पाहिजे हे केल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थाने चांगला समाज निर्माण करता येणार नसल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं आहे.

निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना ‘सुट्टी’ : राज ठाकरेंच्या मागणीची आयोगाकडून दोन दिवसांत दखल

राज्यसभरातील विविध ठिकाणी छापेमारी करीत पुणे पोलिसांकडून 3500 कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या ड्रग्ज प्रकरणाच्या मास्टरमाईंडचा शोध लावण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. संदीप धुनिया असं या मास्टरमाईंडचं नाव असून त्याचा शोध घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांसह इतर यंत्रणाही कामाला लागल्या आहेत. ड्रग्जचा मास्टरमाईंड संदीप धुनिया आखाती देशांतील कुवैतमध्ये लपल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली आहे. पोलिसांनी धुनियाच्या अटकेसाठी सीबीआयची मदत घेतली आहे. तसेच रेड कॉर्नर नोटीसही बजावण्याची तजवीज करण्यात आली आहे. दरम्यान, ड्रग्ज प्रकरणांमध्ये सरकारी पक्षांकडून विशेष वकीलांची नेमणूक करुन फास्टट्रॅक कोर्टात हा खटला चालवला जाणार आहे.

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांशेजारी पाव-पाव उपमुख्यमंत्री; उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संदीप धुनिया हा भारतीय आहे. धुनियाकडे ब्रिटीश पासपोर्ट असून त्याला याआधीही ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. डीआरआयकडून 2016 साली ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी डीआरआयकडून 150 कोटींचं एमडी जप्त करण्यात आलं. या छाप्या आरोपी विपीन कुमारला अटक करण्यात आली होती. सध्या कुमार येरवडा तुरुंगात आहे. तर याचं प्रकरणात संदीप धुनिया जामिनावर बाहेर आहे. धुनियाकडूनच अर्थकेम लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीमधील केमिकल तज्ज्ञ युवराज भुजबळ याला ‘एमडी’ बनवण्याचे काम दिले होते. दरम्यान, राज्यभरात गाजलेल्या या ड्रग्ज प्रकरणावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यावरुन बोलताना अजित पवार यांनी अशा लोकांना सोडणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज