घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांशेजारी पाव-पाव उपमुख्यमंत्री; उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांशेजारी पाव-पाव उपमुख्यमंत्री; उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजपासून बुलढाणा (
Buldhana)जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray group)आयोजित जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि शिवसेना शिंदे गटावर (Shiv Sena Shinde group)घणाघाती टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांना मोठं केलं, ती माणसं गेली पण ज्यांनी मोठं केलं, ती लोकं माझ्यासोबत आहेत की नाही? हे पाहायला मी आलो आहे. त्यांना पन्नास खोके लखलाभो, पण हे जे काही समोर बसलेलं वैभव आहे, ऐश्वर्य आहे, हे त्या गद्दारांच्या नशिबात नाही, असाही घणाघात यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर केला.

महाविकास आघाडीचं जागावाटप कधी फायनल होणार? नाना पटोलेंनी थेट तारीखच सांगितली

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, भलेही धनुष्यबाण काही काळासाठी त्यांनी आपल्याकडून चोरला असेल, शिवसेना चोरण्याचा प्रयत्न ते करतील, पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का ते आयुष्यभर पुसू शकणार नाहीत. आपण मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना मदत मिळाली की नाही? हे विचारण्याचं धाडस आम्ही करतो, तसं धाडस घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि त्यांच्या शेजारच्या पाव पाव उपमुख्यमंत्र्यांनी करुन दाखवावं असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिलं आहे.

‘मंत्री गडकरींना शेतकरी काळे झेंडे दाखविणार’; नेमकं प्रकरण काय?

आपल्या बुलढाणा, हिंगोली, नंदुरबारमध्ये काही विषबाधा झाली. पण याठिकाणी विषबाधा झाल्यानंतर या ठिकाणी उपचारासाठी डॉक्टरदेखील नव्हते. हे आपलं सरकार आहे, एकतर सरकार आपल्या दारी कशासाठी? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली. आज बुलढाण्यामध्ये दुष्काळासारखी स्थिती आहे.

एकतर दोन्ही हंगामाची वाट लागली. खरीप गेला रब्बीलाही अवकाळीनं झोडलं. किती ठिकाणी पंचनामे झाले? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. आपण मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना मदत केली होती, ती शेतकऱ्यांना मिळाली पण आत्ताच्य सरकारने मदतीची घोषणा केली, पण त्याची मदत शेतकऱ्यांना मिळाली का? असा सवाल उपस्थित केला.

देशात जीवाला जीव देणारी माणसं राहिलेली नाहीत. आता जीव घेणारी माणसं निर्माण होताहेत की काय? अशी भिती वाटू लागली आहे, असेही यावेळी उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube