निवडणुका लागताच राज्यस्तरीय पक्ष अधिक मजबूत; शरद पवारांच्या विधानावर अजितदादा स्पष्ट बोलले
Ajit Pawar On Sharad Pawar : देशात लोकसभा निवडणुका (Loksabha Election) लागतात राष्ट्रीय पक्षाऐवजी राज्यस्तरीय पक्ष अधिक मजबूत असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मांडली. दरम्यान, एका मुलाखतीदरम्यान, बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी निवडणुकांमध्ये प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचं खळबळजनक विधान केलं होतं. शरद पवारांच्या या विधानानंतर राज्यातील राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अनेक नेतेमंडळींनी शरद पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली असून आता अजित पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केलीयं.
तीस वर्षे, काँग्रेसच्या भरात अन् पडझडीतही भाजप ‘सुस्साट’; मोदी-शहांचं ‘गृहराज्य’ अभेद्यच!
अजित पवार म्हणाले, शरद पवार यांनी जे विधान केलं, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्यांच्या पक्षाबाबत काय बोललं पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे. देशात जसं जसं निवडणुका सुरु झाल्या, तसं तसं राष्ट्रीय पक्षांऐवजी राज्यस्तरीय पक्ष अधिक मजबूत झाले आहेत. विशेषत: दक्षिण भारतातील पक्ष मजबूत झाल्याचं दिसून आलंय. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळसारख्या राज्यांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं आहे.
अमेरिकेची झलक! AI नियंत्रित लढाऊ जेटची कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात घेतली चाचणी
काय म्हणाले होते शरद पवार?
पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत राहून चांगल्या समन्वयाने काम करतील. यातील काही प्रादेशिक पक्ष त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील, असं शरद पवारांनी एका मुलाखतीत स्पष्ट केल्यानंतर हा निकष तुमच्या पक्षाला लागू होत नाही का? असा सवाल त्यांना करण्यात आला.त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, मला राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात कोणताच फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची विचारसरणी मानणारे आहोत. आता आमच्या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार का याबाबत माझ्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा केल्याशिवाय मी काहीच सांगू शकत नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर राजकारणात वेगवेगळा सूर आवळण्या येत आहे. पवारांच्या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनीही भाष्य केलं आहे. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत, या प्रादेशिक पक्षांना काँग्रेस हाच पर्याय असून प्रादेशिक पक्ष भाजपमुळे ग्रासलेले आहेत, त्यामुळे सर्वच पक्षांना काँग्रेस हाच पर्याय असल्याचं वाटत आहे, त्याच आधारावर शरद पवार यांनी वक्तव्य केलं असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. तर बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे म्हणाल्या, देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. अनेक म्हणजे त्यामध्ये कोणताही पक्ष असू शकतो, सगळे पक्ष आणि अनेक पक्ष यामध्ये अंतर आहे, असं सूचक विधान सुप्रिया सुळे यांनी केलं. आता अजित पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केलीयं.