‘मिशन नो पेन्डसी’ म्हणत देवेंद्र फडणवीसांचं ट्विट…

‘मिशन नो पेन्डसी’ म्हणत देवेंद्र फडणवीसांचं ट्विट…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यालयातला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा फोटो आपल्या ट्विटर हॅंडलवरुन शेअर करीत फोटोला ‘Office work. Clearing pendencies..’, असे कॅप्शन दिले आहे.

राज्यात एकीककडे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. याउलट त्यांनी कार्यालायतला फोटो शेअर केल्याने त्यांची राजकीय वर्तुळात एकच चर्चा होत आहे.

महाविकास आघाडीतील केंद्रस्थानी समजले जाणारे नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु होती. यासोबतच अजित पवारांनी अमित शाहा यांची भेट घेतल्याचंही बोललं जात होतं.

सीमाभागात प्रचारासाठी पक्षाच्या नेत्यांना पाठवू नका; एकीकरण समितीकडून काँग्रेस-भाजपला पत्र

एवढंच नाहीतर राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी अजित पवारांच्या भाजप प्रवेशावर त्यांना जाहीरपणे पाठिंबाही जाहीर केला होता. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. अखेर अजित पवारांनी मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं.

Vinod Tawde Committee Report : भाजपचं टेन्शन वाढवणाऱ्या ‘त्या’ अहवालावर तावडेंचं स्पष्टीकरण…

या संपूर्ण घडामोडीवर राजकारणातले चाणक्य समजले जाणारे उपमुख्यमंत्री मात्र, शांत असल्याचं पाहायला मिळालं. अद्यापही फडणवीस यांनी अजित पवारांच्या भाजप प्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, अजित पवारांच्या भाजप प्रवेशावर न बोलता आज त्यांनी आपला कार्यालयातला एक फोटो पोस्ट करीत Mission #NoPendency ! Office work. Clearing pendencies.. कार्यालयीन कामकाज.. असं म्हंटलं आहे. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube