शिंदेंना वगळून आपत्ती व्यवस्थापन समितीत अजित पवारांची वर्णी; फडणवीसांचा दुसरा धक्का

शिंदेंना वगळून आपत्ती व्यवस्थापन समितीत अजित पवारांची वर्णी; फडणवीसांचा दुसरा धक्का

Devendra Fadanvis Disaster Management Committee withdrawn by Eknath Shinde : सर्वांना धक्का देत विधानसभा निवडणुकीत महायुतीने एक हाती विजय मिळवत राज्यात दुसऱ्यांदा सरकार स्थापन केली आहे. मात्र राज्याची कमान एकनाथ शिंदे यांच्याकडे नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर विविध महत्त्वाची खाती देखील त्यांच्याकडे देण्यात आली नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिंदेंकडून आणखी एक समिती काढून घेण्यात आली आहे.

बातमी फेक, ऋषीराज सावंत यांचं अपहरण नाही, तानाजी सावंतांच्या कार्यालयाची माहिती

आपत्ती व्यवस्थापन समिती काढून घेतली आहे. त्यामुळे आता अगोदरच नाराज असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये विविध चर्चांना उधान आले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळण्यात आले आहे. या समितीची सुत्रे फडणवीसांनी आपल्याकडे घेतली आहेत. त्याचबरोबर नुकतीच याच समितीत उपमुख्यमंत्री अजित पवारांची वर्णी लागली आहे.

देशाला पुढे नेण्यासाठी युवाशक्ती ची आवश्यकता, दत्तात्रय भरणे यांचे मत

दरम्यान गेल्या तीन चार दिवसांपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेकडे मंत्रीपद असलेल्या परिवहन खात्यामध्येही एक निर्णय घेतला होता. तो म्हणजे एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर जेष्ठ सनदी अधिकाऱ्याची नेमणुक केली आहे. यानंतर लगेचच फडणवीसांनी पमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळले आहे. त्यामुळे शिंदेंच्या नेत्यांमध्ये चलबिचल पाहायला मिळत आहे.

‘पक्ष संघटनेत बदल करणे आवश्यक’; दिल्लीत पराभवानंतर तारिक अन्वरांकडून कॉंग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह…

तसेच अनेकदा शिंदे माध्यमांसमोर येत नाहीत. अनेक शासकीय कार्यक्रमांना एकनाथ शिंदे उपस्थित नसतात. मात्र शिंदेंकडून तसेच फडणवीसांकडून शिंदे नाराज नसल्याची माहिती देण्यात येते.

नुकतंच राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती त्यानंतर शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. यातच मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाही. ते या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे (Video Conferencing) उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते.

तसेच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये रायगडच्या पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याचा दावा करण्यात येते. त्यामुळेच एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्यक्ष उपस्थित राहिले नसल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्यक्ष अनुपस्थितीवर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube