आमच्या पराभवाच विश्लेषण आम्ही करू त्यासाठी दुसऱ्यांची गरज नाही…फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला

आमच्या पराभवाच विश्लेषण आम्ही करू त्यासाठी दुसऱ्यांची गरज नाही…फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला

Devendra Fadnavis criticizes Raj Thackeray : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य करताना त्यांनी भाजपवर टीका केली. आपला कोणीच पराभव करू शकत नाही अशा भ्रमात राहिल्यानं भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. आमच्या पराभवाच विश्लेषण आम्ही करू त्यासाठी आम्हाला दुसरं कोणी नको. अशा शब्दात फडणवीसांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

नुकतेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपचा सुपडासाफ झाला तर काँग्रेसने निवडणुकीत मुसंडी मारली. दरम्यान भाजपला पराभवाला सामोरे जावे लागल्याने यावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या पराभवावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे?
विरोधी पक्ष कधी जिंकत नाही सत्ताधारी हरत असतात. पराभव हा स्वभावाचा पराभव आहे. आपलं कोणीच वाकड करू शकत नाही, असं समजणाऱ्या प्रवृत्तीचा हा पराभव आहे. लोकांना कधीही गृहीत धरू नये, या निकालांमधून सगळ्यांनी बोध घेण्यासारखा आहे. असं राज ठाकरे म्हणाले होते.

RR vs RCB : आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा प्लेइंग इलेव्हन

ठाकरेंना फडणवीसांचा पलटवार
आमच्या पराभवाच विश्लेषण आम्ही करू त्यासाठी आम्हाला दुसरं कोणी नको. पण ठीक आहे त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. आम्ही अनेक निवडणूक जिंकल्या आहेत तर काहींना पराभवाला देखील सामोरे गेलो आहे. मात्र आमचा विजयाची सरासरी ही अधिक आहे. मात्र कधीकधी स्थनिक अडचणी आल्याने असे निकाल येतात.

आदित्य ठाकरे दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या भेटीस, राजकीय चर्चांना उधाण

काहींना मूर्खांसारखं बोलायची सवय…
निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून ईव्हीएममध्ये बिघाड करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, काहींना मुर्खासारखे बोलण्याची सवय असते. मात्र माझा त्यांना सल्ला आहे की त्यांनी बोलताना जरा डोकं वापरावे. अशा शब्दात फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube