‘माझं कान, नाक मोठं दाखवा, पण पोट मोठं दाखवू नका’, फडणवीसांनी राज ठाकरेंना विनंती केली होती…
‘माझं कान, नाक मोठं दाखवा, पण पोट मोठं दाखवू नका’, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना केली असल्याचं खुद्द फडणवीसांनी सांगितलं.
Cm Devendra Fadanvis : ‘माझं कान, नाक मोठं दाखवा, पण पोट मोठं दाखवू नका’, अशी राज ठाकरेंना विनंती केली असल्याचा मजेशीर किस्सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra Fadanvis) यांनी सांगितला आहे. मुंबईत ग्रंथाली तर्फे प्रशांत कुलकर्णी यांच्या ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम गुरुवारी पार पडला. या कार्यक्रमाच्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी झालेल्या भाषणांमध्ये देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या तिन्ही नेत्यांनी राजकीय टोलेबाजी केलीयं.
🔸CM Devendra Fadnavis unveils ‘Maharashtrachya Hasyaresha’, a book compiled by Editor and Cartoonist Prashant Kulkarni.
Minister Adv. Ashish Shelar, Uddhav Thackeray, Raj Thackeray and other dignitaries were present.🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपादक व व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाचे प्रकाशन.
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, व अन्य मान्यवर उपस्थित होते.🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से संपादक व व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी इनके द्वारा संपादित ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ इस पुस्तक का विमोचन।
इस अवसर पर मंत्री एड. आशिष शेलार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।🕗7.45pm | 29-10-2026📍Mumbai | संध्या. ७.४५ वा. | २९-१०-२०२६📍मुंबई.
@Dev_Fadnavis @ShelarAshish @uddhavthackeray @RajThackeray
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #BookRelease— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 29, 2026
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी एकदा राज ठाकरेंना विनंती केली होती की, तुम्ही माझं कधी व्यंगचित्र काढलं तर माझं नाक मोठं दाखवा, कान मोठे दाखवा, पण पोट काही मोठं दाखवू नका. अशी विनंती मी त्यांना केली होती, त्यांनी माझी विनंती ऐकली आणि त्यानंतर माझं पोट मोठं दाखवलं नाही. मात्र, बाकी लोक ऐकतच नाहीत. त्यांना फक्त माझं पोट दिसतं. पण अलिकडच्या काळात मी तेही कमी केलंय. त्यामुळे आता काही व्यंगचित्रकार त्यातून मला सोडतील असा मला विश्वास आहे”, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिश्किल टिप्पणी केली.
तसेच एका व्यंगचित्राची शक्ती किती आहे, तर एका व्यंगचित्रकाराने व्यंगचित्र काढलं, त्यामध्ये नेपोलियन आणि ब्रिटिश प्राइम मिनिस्टर बसलेले आहेत. त्यांच्यामध्ये केक किंवा अॅपल पेस्ट्री अशी पृथ्वी आहे, ज्यामध्ये पृथ्वीचे ते तुकडे करत आहेत असं त्या व्यंगचित्रात दिसत होतं. ते व्यंगचित्र पाहिल्यानंतर नेपोलियनने सांगितलं की युरोपची सेना माझं जेवढं नुकसान करू शकली नाही, तेवढं नुकसान आणि बदनामी एका व्यंगचित्राने केली. ही व्यंगचित्राची ताकद असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं आहे.