Supriya Sule : अजितदादांना अपमानासाठी सत्तेत घेतलं का?; पडळकरांच्या विधानावर सुळे भडकल्या

Supriya Sule : अजितदादांना अपमानासाठी सत्तेत घेतलं का?; पडळकरांच्या विधानावर सुळे भडकल्या

Supriya Sule : अजित पवार(Ajit Pawar) यांचा अपमान करण्यासाठीच सत्तेत बरोबर घेतलं का? असा सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) भडकल्या आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह(Sharad Pawar) अजित पवार(Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्यावर खालच्या पातळीवर वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून गोपीचंद पडळकरांचा खरपूस समाचार घेतला.

IND vs AUS : एकदिवसीय मालिकेत अश्विन 21 महिन्यांनी परतला, रोहित-आगरकरचा नेमका प्लॅन आहे तरी काय?

सुप्रिया सुळे(Supiya Sule) म्हणाल्या, अजित पवार भाजपाबरोबर सत्तेत आहेत. सत्तेत असताना अजित पवार यांचा मित्रपक्ष त्यांच्याबद्दल अशी वक्तव्य करतो, हे अतिशय वाईट आहे. भाजपानं मोठ्या मनानं अजित पवारांना सत्तेत बरोबर घेतलं. पण, अजित पवारांचा अपमान करण्यासाठी बरोबर घेतलं का? याचं उत्तर भाजपानं दिलं पाहिजे, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.

IND vs AUS: टीम इंडियाची घोषणा, रोहित-विराटला विश्रांती; अश्विनचे ​​पुनरागमन

तसेच मित्रपक्षाबद्दल बोलण्याची ही कुठली पद्धत आहे, हे दुर्दैवी आहे. हा अजित पवारांचा अपमान असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवलं आहे. सध्या राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात धनगर बांधवांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारेंवर मध्यरात्री हल्ला, एकटं गाठून गाडी अडवली अन्…

यावर बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे लबाड लांडग्याची लेक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे लबाड लांडग्याचं पिल्लू आहे, त्यामुळे ते धनगर समाजाची आरक्षणाची मागणी मान्य करणार नसल्याचं विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं.

‘अजितदादांना सोबत घेण्याचा निर्णय भाजपचाच’; खोतकरांच्या वक्तव्याने खळबळ

पडळकरांच्या विधानावर फडणवीस काय म्हणाले?

गोपीचंद पडळकरांच वक्तव्य अयोग्य असून अशा प्रकराचं विधानं करणं चुकीचंच आहे. तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. या प्रकारच्या भाषेचा वापर करू नये, या शब्दांत फडणवीस यांनी गोपीचंद पडळकरांना सुनावलं आहे.

राधाकृष्ण विखे म्हणाले :
गोपीचंद पडळकरांच्या विधानानंतर राष्ट्रावादीच्या नेत्यांकडून पडळकरांसह भाजपच्या नेत्यांवर टीकेची तोफ डागण्यात येत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वत:वर आवर घालावा, या शब्दांत विखे पाटलांनी गोपीचंद पडळकरांचे कान टोचले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube