गिरा तो भी टांग उपर; फडणवीसांच्या वकव्याचा एकनाथ खडसेंकडून समाचार

गिरा तो भी टांग उपर; फडणवीसांच्या वकव्याचा एकनाथ खडसेंकडून समाचार

Eknath Khadse on Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या कर्नाटक विधानसभेचा निकाल Karnataka Assembly Result) काल समोर आला. कर्नाटक विधानसभेच्या एकूण 224 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसने 136 जागा जिंकल्या तर भाजपला केवळ 65 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत राष्ट्रवादीनेही आपले उमेदवार उभे केले. मात्र, एकही उमेदवार विजयी झाला नाही. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. दरम्यान, फडणवीसांच्या टीकेचा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. गिरा तो भी टांग उपर अशा स्वरूपाचे देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य दिसते, अशी टीका खडसे यांनी केली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
शरद पवार यांनी कर्नाटकात जागा लढवल्या. मात्र, तेथे त्यांना एक टक्काही मते मिळाली नाहीत. राष्ट्रवादीला ०.5 टक्क्यांहून कमी मते मिळाली. मी म्हणालो, त्यांच्या उमेदवाराला ‘पॅक’ करा आणि परत पाठवा. निपाणीतील जनतेने माझे ऐकले असून शरद पवार यांच्या उमेदवाराला पॅक करून परत पाठवले आहे, असे फडणवीस यांनी शनिवारी राष्ट्रवादीला सुनावले. त्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, फडणवीसांच्या टीकेला खडसेंनी उत्तर दिलं. एकनाथ खडसे म्हणाले, भारतीय जनता पार्टीचा किंवा जनसंघाचा इतिहास पाहिला तर अनेक वर्ष अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या जागा निवडून येत नव्हत्या. किंबहुना आता जरी साउथ इंडियामधील राज्यांमध्ये पाहिलं तरी तिथेही भारतीय जनता पार्टीला फारसा प्रतिसाद मिळत नाही, मग अशा ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पार्सल परत पाठवले म्हणायचं का? असा खोचक टोला लगावला.

खडसे म्हणाले, शेवटी कोणताही राजकीय पक्ष प्रयत्न करतच असतो, भारतीय जनता पार्टीचे अनेक ठिकाणी डिपॉझिट जप्त झाल्याचे शेकडो उदाहरणे आहेत, दक्षिनेते भाजपची खूप नाजूक परिस्थिती झालेली आहे, गिरा तो भी टांग उपर अशा स्वरूपाचे देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य दिसत आहे. कर्नाटक मध्ये काँग्रेसला यश मिळालं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विरोधी पक्ष आहेत त्यांना यश मिळाले, म्हणजे भाजपच्या विरोधी पक्षांचे मनोबल वाढले आहे.

देशभरामध्ये विरोधी पक्ष एकत्र राहिला तर बऱ्यापैकी यश मिळू शकेल, हा विश्वास वाढत आहे, आता जे दहा वर्षभरामध्ये आपण चित्र देशात पाहिलं, यापेक्षा वेगळे चित्र पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको. कर्नाटकच्या विजयानंतर महाविकास आघाडीचे मनोबल वाढलेले आहे, असं खडसेंनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube