Video : दिल्ली विधानसभेच्या तारखांची घोषणा अन् निवडणूक प्रमुखांचा शायराना अंदाज

Video : दिल्ली विधानसभेच्या तारखांची घोषणा अन् निवडणूक प्रमुखांचा शायराना अंदाज

Election Commission Announced Delhi Assembly Election Dates : भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक (Election Commission) आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. 8 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. यावेळी सर्वांना निवडणूक प्रमुखांचा शायराना अंदाज (Delhi Assembly Election) पाहायला मिळाला.

यादरम्यान राजीव कुमार यांची शायरी पाहायला मिळाली. दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले की, “सबसे सवाल अहमियत रखते हैं, जवाब तो बनता है आदतन कलम बंद जवाब देते रहे, (Election News) आज रूबरू भी बनता है क्या पता कल हम हो न हों, आज जवाब तो बनता है”. राज्यांच्या निवडणूक निकालांशी संबंधित आकडेवारी दाखवताना विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर राजीव कुमार म्हणाले की, “कर ना सकें इकरार तो कोई बात नहीं, मेरी वफा का उनको एतबार तो है, शिकायत भले ही उनकी मजबूरी हो, मगर सुनना – सहना – सुलझाना हमारी आदत तो है”.

HMPV Virus : आरोग्यमंत्रांनी मोजक्या शब्दात कमी केली मनातली भीती; पाहा व्हिडीओ

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याअगोदर राजीवर कुमार म्हणाले की, “आरोपों और इल्जामों का दौर चले कोई गिला नहीं, झूठ के गुब्बारों को बुलंदी मिले कोई शिकवा नहीं, हर परिणाम में प्रमाण देते हैं, पर वो बिना सबूत शक की नई दुनिया रौनक करते हैं, शक का इलाज तो हकीम लुकमान के पास भी नहीं”.

निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेदरम्यान राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, तरुणांनी लोकशाहीत वाढता सहभाग ठेवावा. यापुढील काळातही लोकशाही मजबूत होत राहील. एकूण मतदारांची संख्या 99 कोटींच्या पुढे गेलीय. लोकसभा निवडणुकीत नवा विक्रम झाला आहे. हिंसाचारमुक्त निवडणुका झाल्या. निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, राजकीय पक्षांनी काही चिंता व्यक्त केल्या होत्या. मतदार यादीतून नावे चुकीच्या पद्धतीने जोडून वगळण्यात आल्याचे सांगण्यात आले. मतदार याद्यांमधून नावे काढताना किंवा जोडताना योग्य ती प्रक्रिया काटेकोरपणे पाळली जाते, कोणत्याही प्रकारची हेराफेरीला वाव नाही, असेही राजीव कुमार म्हणाले.

‘जिलबी’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ तारखेला सिनेमागृहात होणार प्रदर्शित

दिल्लीत विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तीन दिवसांनंतर 8 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारीला संपतोय. दिल्लीत विधानसभेच्या 70 जागा आहेत, त्यापैकी 58 सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर 12 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. दिल्लीत एकूण 1.55 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. त्यापैकी 83.49 लाख पुरुष आणि 71.74 लाख महिला आहेत. दिल्लीत 2,697 ठिकाणी एकूण 13,033 मतदान केंद्रे असणार आहेत. त्यापैकी 210 मॉडेल मतदान केंद्र असतील.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube