पक्षाशी बंडखोरी करून उमेदवारी दाखल करणे गंभीर ; अशोक चव्हाण यांची टीका
नांदेड : सत्यजीत तांबे यांनी पक्षाशी बंडखोरी करत उमेदवारी दाखल करणं गंभीर असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले आहे. जर मुलाची इच्छा होती, तर त्याच्या नावेही उमेदवारी दाखल करता आली असती. पण उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलाने उमेदवारी दाखल करणं ही गंभीर विषय असल्याचे मत अशोक चव्हाणंनी स्पष्ट केले आहे.
खरेतर मूळ उमेदवार हे सुधीर तांबे असताना त्यांनी नामांकन पत्र भरले नाही. त्या जागी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. यामुळे सत्यजीत तांबेचं हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी नामांकन फॉर्म कोरा दिला होता. या प्रकरणाची माहिती बाळासाहेब थोरात यांना असू शकणार आहे. याविषयी पक्षश्रेष्ठींनी देखील दखल घेणं गरजेचे असल्याचे अशोक चव्हाण यांनी यावेळी म्हणाले आहेत .
दरम्यान, हे घडण्यामागचं नेमक कारणं काय? हे समजून घेणं गरजेचे आहे. अशा घटनांवर पक्षाने गंभीर दखल घ्यावी, असे मत अशोक चव्हाणाचे आहे. या घटनेमुळे पक्षाला एक जागा गमवावी लागत आहे. काल जे काही घडलं आहे. त्यामध्ये पक्षाचे खूप मोठे नुकसान आहे. यावर कोणी बोलू किंवा न बोलू जे घडलं आहे ते समोर आहे. यामुळे यातील सत्यता तपासावी लागणार असल्याचे मत अशोक चव्हाणंचे आहे.