ठाकरेंसाठी कोविड कमाईचं साधन होतं, सोमय्यांचा वार
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या विरोधी पक्ष आणि महाविका, आघाडी सरकारच्या नेत्यांच्या गैरव्यवहारांचा पर्दाफाश करण्याच्या कायम मागावार असतात. यामध्ये त्यांनी आतापर्यंत शिवसेनेचे अनिल परब, संजय राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीच्या धाडी आणि अटक असं सत्र सरू आहे.
यादरम्यान आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा मुंबई महानगरपालिकेकडे वळवला आहे. कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता होती. तर कोविडच्या काळामध्ये महानगरपालिकेने काही गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या म्हणाले, ‘त्या वेळेच्या उद्धव ठाकरे सरकार साठी कोविड म्हणजे कमाईचा साधन झालं होत.’
‘महापालिकेच्या अधिकाऱ्याने स्वतःच्याच कंपन्या काढल्या होत्या. तशाच पद्धतीने संजय राऊत यांचे पार्टनर सुचित पाटकर यांनी लाईफ लाईन हॉस्पिटल कंपनी काढली होती. कुठलाही अनुभव नसताना बोगस कंपनी काढली होती. आणि त्यावर गुन्हा दाखल होऊन 140 दिवस झाले तरी महापालिका आयुक्त इकबाल चहल यांचे डॉक्युमेंट्स तपास यंत्रणांना देत नव्हते.’
त्यामुळे आता चौकशीमध्ये कमिशनर यांना जाब द्यावाच लागणार आहे. असंही सोमय्या म्हणाले आहे. यामध्ये महापालिका आयुक्त इकबाल चहल यांचा संबंध नाही असं सांगण्यात येत आहे. मात्र चहल यांचा संबंध आहे. कारण संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या पार्टनरला हे कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलं आहे. त्यामुळे याला चहल यांचा पाठिंबा असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
‘इक्बाल चहल म्हणजे भारताचे संविधान नाही. त्यांचं कॅग पण ऑडिट करणार. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या नावाने पेमेंट झालं तर इकबाल चहल असो तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर असो किंवा संजय राऊत यांचे पार्टनर असो सर्वांनाच हिशोब द्यावा लागणार.’ असंही सोमय्या म्हणाले आहेत.