Devendra Fadanvis and Ajit Pawar : अजित पवार माझ्याकडे आले होते भगतसिंह कोशारी यांचे खळबळजनक वक्तव्य

Devendra Fadanvis and Ajit Pawar : अजित पवार माझ्याकडे आले होते भगतसिंह कोशारी यांचे खळबळजनक वक्तव्य

मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकताचं आपल्या राज्यापाल पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळातील काही गौप्यस्फोट केले आहेत. ते म्हणाले की,

कोश्यारी यांना यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, जे राजकारणी आहेत, नेते आहेत, चिंतक आहेत ते विचार करत असतील हे कसं काय झालं ? कधी-कधी अशा गोष्टी एका क्षणात घडतात तर एका रात्रीचं काय एका क्षणात भूकंप येऊ शकतो. पण हा पहाटेचा शपथविधी एका रात्रीत झालेला नाही.

Pune : पुण्यात वातावरण पेटले ; शिंदे-फडणवीसांची जाहीर सभा तर अजितदादांची बाईक रॅली

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही नेते माझ्याकडे आले. कागद पत्रांवर त्यांच्या सह्या आहेत.ते काही छोटे-मोठे नेते नाहीत. अजित पवार देखील एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत. ते माझ्याकडे आले तर मी म्हणालो तुमच्याकडे बहुमत आहे तर सिद्ध करा. सिद्ध कारायला वेळ देखील दिला. पण त्यानंतर कोर्टाने हा वेळ कमी करायला सांगितला. तर हा वेळ कमी करण्यात आला. पण त्यांच्याकडे बहुमत नव्हत त्यांनी राजीनामाही दिला. हे सर्व सामान्य होतं.

महाराष्ट्रात आल्यावर ज्याप्रमाणे राजकारणात 2 आणि 2 मिळून 4 होईलच असं नाही ते 3 ही होऊ शकतात. त्याप्रमाणे इतर राज्यातही होतं. तसं महाराष्ट्रातही झालं. मी प्रत्यक्ष राजकराणात उशिरा आलो पण अनेक वर्ष राजकारण पाहिलं आहे. असं यावेळी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube