Bhimashankar Temple आसाममध्ये असल्याचा सरकारचा दावा, काँग्रेसची सडकून टीका; म्हणाले, “भाजपाने…”

Bhimashankar Temple आसाममध्ये असल्याचा सरकारचा दावा, काँग्रेसची सडकून टीका; म्हणाले, “भाजपाने…”

मुंबई : ‘केवळ उद्योगच नव्हे तर आता भाजपला (BJP) महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे आहे. आता भाजपच्या आसाम (Assam Government ) सरकारचा दावा आहे की भीमाशंकरचे सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्ह्यात नसून आसाममध्ये आहे. या अत्यंत आगाऊपणाच्या दाव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. असे काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्वीट करत शिंदे फडणवीस सरकारवर (Shinde Fadnavis Govt) सडकून टीका केली.

शिंदे फडणवीस सरकारने तात्काळ भूमिका स्पष्ट करुन आसाममधील भाजप सरकारच्या या निंदनीय कृतीचा निषेध केला पाहिजे. भाजपाने केवळ महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्याच नव्हे तर तमाम भारतीयांच्या श्रद्धा, भावना दुखावल्या आहेत. भाजपाचा महाराष्ट्राबद्दलचा आकस सातत्याने दिसून येत आहे. आसाममधील भाजपाच्या निंदनीय कृतीवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीका केली आहे.

तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ आणि विधानसभेच्या २०० जागा जिंकण्यासाठी भाजपने महाविजय- २०२४ अभियान शनिवारी जाहीर केले. राष्ट्रवाद आणि विकासाच्या मूलमंत्राने विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी समाजमाध्यमांवर सक्रिय होण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले. भाजपाच्या या अभियानावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी निशाणा साधला आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube