‘त्या’ आरोपांवर गुलाबराव म्हणाले…तर मी एका मिनिटात राजीनामा देईन

‘त्या’ आरोपांवर गुलाबराव म्हणाले…तर मी एका मिनिटात राजीनामा देईन

Gulabrao Patil : शिवसेनेतील बंडानंतर राज्यात आता शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. यातच दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांवर टीका टिप्पणी करत असतात. नुकतेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यावर पाटील म्हणाले, जर तो आरोप सिद्ध झाला तर मी एका मिनिटात राजीनामा देईन अन्यथा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खासदारकी सोडावी, असे खुले आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.

अहो ते एवढं सोपं नाही; भाजपा प्रवेशावर शिंदेंचा गुलाब नबींना चिमटा

नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
‘माझ्या हातातील कागद जळगावच्या पालकमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे कागद आहेत. कोरोना काळात पालकमंत्री म्हणून त्यांनी जी चढ्या भावाने खरेदी केली. त्यात वैद्यकिय उपकरणे आहेत. दोन लाखांचे व्हेंटीलेटर पंधरा लाखांना खरेदी केले. त्यांच्याच गँगच्या एका आमदाराने प्रश्न उपस्थित केले आहेत. हे सगळे प्रकरण आता बाहेर काढू’, असा इशारा राऊत यांनी दिला होता.

YSSharmila : मुख्यमंत्र्यांच्या बहिणीची दबंगगिरी… थेट पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली

राऊतांच्या आरोपावर पाटलांचे उत्तर
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, राऊत हे नेहमी बेताल वक्तव्य करतात. त्यांनी माझ्यावर कोरोनाकाळात चारशे कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. मात्र राऊत यांनी जळगावात येत 3 दिवस ठिय्या मारून स्वतः चौकशी करावी. कोरोनाकाळात पूर्ण १२१ कोटी रुपयाला मान्यता मिळाली आणि चारशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा ते आरोप करीत आहेत. अत्यंत चुकीचा ते आरोप करीत आहेत. त्यांनी ठाकरे व तत्कालीन आरोग्यमंत्री टोपेंकडून माहिती घ्यावी. जर साधा रुपयाचाही भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले तर आपण एका मिनिटात मंत्री व आमदारपदाचा राजीनामा देऊ; जर सिद्ध झाले नाही तर राऊतांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे आव्हानही त्यांनी दिले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube