Modi-Shinde Chemistry : हाेय, आम्ही माेदींचीच माणसं…माेदी-शिंदेंची केमिस्ट्री

  • Written By: Published:
Modi-Shinde Chemistry : हाेय, आम्ही माेदींचीच माणसं…माेदी-शिंदेंची केमिस्ट्री

पुणे : “मी जेव्हा दावोसमध्ये गेलो. तेव्हा मला जर्मनी, सौदी आरेबिया अशा अनेक देशांचे प्रमुख नेते भेटले. ते सर्व मला म्हणायचे, तुम्ही मोदींसोबत आहात ना? तेव्हा मी त्यांना सांगायचो होय, आम्ही मोदींचीच माणसं आहोत”, असा किस्सा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एका कार्यक्रमात सांगितला. माेदी-शिंदे केमिस्ट्री जुळण्यामागे दाेन-तीन कारणं आहेत. त्यामध्ये 2019 च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपशी फारकत घेतली. नेमके त्यावेळेपासूनच पंतप्रधान नरेंद्र माेदी (Narendra Modi) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात खलबतं सुरु झाली आणि गुवाहाटीपासून माेदी-शिंदे यांच्या केमिस्ट्रीला सुरुवात झाली, असेच म्हणावे लागेल.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच दावोस दौरा करुन आले. मुंबईतील बीकेसी येथे झालेल्या भाषणादरम्यान शिंदे यांनी दावाेस दौऱ्यादरम्यान काय अनुभव आला याबाबत माहिती दिली. यावेळी पंतप्रधान माेदी यांच्या विषयाचा एक किस्सा सांगितला. “अनेक देशांचे लोकं येऊन माझ्यासोबत फोटो काढत होते, हे फोटो मोदीजींना दाखवा असं त्या लोकांनी मला सांगितलं. त्यामुळे मला दावोसमध्ये पंतप्रधान मोदी यांचा करिश्मा दिसला”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबईतील वेगवेगळ्या विकासकामांचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. बीकेसीच्या मैदानात विविध विकासकामांचा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पहिल्यांदा भाषणाला सुरुवात केली. फडणवीस यांचे भाषण सुरु असताना मंचावर एक वेगळा प्रकार बघायला मिळाला. मुख्यमंत्री शिंदे हे पंतप्रधान मोदी यांना मोबाईलवर फोटो दाखवत होते. मोदी यांनीसुद्धा शिंदे दाखवत असेलेले सर्व फोटो पाहिले. शिंदे आणि मोदी यांच्या यावेळच्या संभाषणाचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र माेदी हे अत्यंत कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जवळ जाणे तसे पाहिले तर अशक्य गाेष्ट आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्याला अपवाद आहेत. समृद्धी महामार्गाचे उद्घाटन कार्यक्रम असाे की मुंबईतील बीकेसीचा कार्यक्रम असाे. त्यांची केमिस्ट्री बहरत असल्याचे पाहयला मिळत आहे. येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री हाेणार का, हे पाहणे आता औत्सुकतेचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube