लातुरमध्ये काँग्रेसची मुसंडी; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं विलासराव देशमुखांबद्दलच वक्तव्य भाजपला भोवलं
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असे वादग्रस्त विधान केले होते
लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलात काँग्रेस व भाजपमध्ये चुरस दिसत होती. मात्र, आता काँग्रेस पक्षाने ३७ तर वंचित बहुजन आघाडीने सर्व पाच जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपसाठी हा धक्का असून काँग्रेस-वंचित आघाडीने बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असे वादग्रस्त विधान केले होते. याचा फटका भाजपला बसल्याचे दिसते आहे.
