अखिल भारतीय सेनेकडून दगडी चाळीत डॅडींच्या दोन्ही मुलींचा पराभव
अरुअण गवळीची मुलगी योगिता गवळी हिचा मुंबई महापालिका निवडणुकीत भायखळा प्रभाग क्रमांक 207 मधून पराभव झाला आहे.
दगडी चाळीतील कुख्यात गँगस्टार अरुण गवळी याचा अखिल भारतीय सेनेकडून त्यांच्या दोन्ही मुली महापालिका निवडणुकीच्या रिंगणात होत्या. गीता गवळी या 212 क्रमांच्या वॉर्डमधून तर योगिता गवळी वॉर्ड क्रमांक 207 मधून उमेदवार होत्या. त्यांना भाजपच्या उमेदवारांनी धूळ चारली आहे. भायखळा परिसरात ज्या ठिकाणी दगडी चाळ आहे. त्या परिसरात हे वार्ड येतात. ‘डॅडी’च्या बालेकिल्ल्यातच त्यांच्या दोन्ही मुलींचा पराभव झाला आहे.
अरुअण गवळीची मुलगी योगिता गवळी हिचा मुंबई महापालिका निवडणुकीत भायखळा प्रभाग क्रमांक 207 मधून पराभव झाला आहे. योगिता गवळी ही भायखळा प्रभाग क्रमांक 207 मधून अखिल भारतीय सेनेकडून निवडणूक लढवली होती. मात्र तिचा भाजपच्या उमेदवाराकडून पराभव झालाय. गीता गवळी यांचं शिक्षण एमएससीपर्यंत झालं आहे तर योगिता एमए शिकल्या आहेत.
2019 ची विधानसभा निवडणूकही गीता गवळी यांनी लढली होती, त्यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता 3.38 कोटी रुपये होती. या निवडणुकीत त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची मालमत्ता दुपटीने वाढली असल्याचे दिसते.
योगिता गवळी यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता 3.65 कोटी रुपये इतकी आहे. योगिता यांच्या नावावर 750 ग्रॅम दागिने आहेत. त्यांच्या पतीच्या नावावर बीएमडब्ल्यू कार याशिवाय 250 ग्रॅम दागिने आहेत. योगिता या अरुण गवळीच्या लहान कन्या आहेत. योगिता या गवळी कुटुंबातील तिसरी व्यक्ती आहेत ज्या थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.
