शिंदे फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहेत का? Rohit Pawar यांचा सवाल

  • Written By: Published:
शिंदे फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहेत का? Rohit Pawar यांचा सवाल

नाशिक : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहे का? या गोष्टी अयोग्य आहे. सर्व समाजासाठी एकत्रित धोरण ठरविणे गरजेचे आहे.इतर समाजाचे देखील प्रलंबीत प्रश्न आहे, ते सोडविणे आवश्यक असल्याचे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानावर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जोरदार टीका केली आहे.

रोहित पवार म्हणाले, अशापद्धतीने विकास बाजूला ठेवून जे वक्तव्य तुम्ही करतात ते अयोग्य आहे. सर्वसमावेशक राजकारण करण्याची तुम्हाला गरज आहे. जातीय आणि धार्मिक राजकारण महाराष्ट्रात आणू नये असे मत रोहित पवार यांनी यावेळी उपस्थित केले.

नाशिकमध्ये (Nashik) आज महाराष्ट्र व्हिजन फोरम च्या माध्यमातून युवकांशी संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. जळगावमधील एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी मराठा चेहरा असावा यासाठी गद्दारी केली, असे वक्तव्य केले. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Narayan Rane : उद्धव ठाकरेंकडे राहिले तरी काय ? ; नारायण राणेंनी पुन्हा डिवचले 

ज्यावेळी अनेक गोष्टी हाताबाहेर जातात, त्यावेळी अशी वक्तव्ये केली जातात. एकनाथ शिंदे फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहे का? या गोष्टी अयोग्य आहे. सर्व समाजासाठी एकत्रित धोरण ठरविणे गरजेचे आहे. इतर समाजाचे देखील प्रलंबित प्रश्न आहे, ते सोडविणे आवश्यक आहे, असेही पवार म्हणाले.

गुलाबराव पाटील म्हणाले होते की गुलाबराव (Gulabrao Patil) गद्दार झाला म्हणतात. मी गद्दार झालो नाही, तर मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर जात होता त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली. जळगावात जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube