पहलगाम हल्ला… केंद्र शासनाचे अपयश, जयंत पाटलांचा हल्लाबोल

पहलगाम हल्ला… केंद्र शासनाचे अपयश, जयंत पाटलांचा हल्लाबोल

Jayant Patil Criticized Central Government On Pahalgam Attack : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावरून जयंत पाटलांनी (Jayant Patil) केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. हे केंद्र शासनाचं अपयश असल्याची टीका त्यांनी केलीय. आजवर केंद्र शासनाने काश्मीर अत्यंत सुरक्षित आहे, दहशतवादी घटना (Pahalgam Attack) संपुष्टात आल्याचं सांगितलं, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका जहरी केली आहे.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे केंद्र शासनाचे सर्व दावे पोकळं ठरलेत. हल्ला झाला त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा यंत्रणा नव्हती, याचंच आश्चर्य वाटतंय. आपली यंत्रणा किती गाफील आहे, हे यातून स्पष्ट होतंय. या हल्ल्यावर राजकारण न करता ठोस पावले उचलली जावीत. तसेच हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा शोध घेतला पाहिजे. तसेच संबंधित दहशतवाद्यांना पकडून कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय.

Pahalgam Terror Attack : पीडित कुटुंबांना न्याय मिळणार! ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींनी दिले आश्वासन

मोठ्या संख्येने पर्यटक असलेल्या ठिकाणी दहशतवादी सहजपणे पोहोचतात. त्यानंतर बेसावध पर्यटकांवर हल्ला करतात, हे सगळंच धक्कादायक आहे. लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांना अंदाज असायला हवा की, देशाच्या आतील भागात 300 किलोमीटर अंतरापर्यंत सुद्धा हल्ला होऊ शकतो, असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलंय. तर महाराष्ट्र आज आर्थिकदृष्ट्या मागे पडतोय. कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती देखील वाईट असून धार्मिक द्वेष पसरवला जातोय.

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल; महाराष्ट्र पोलिसांबद्दल ‘ते’ वक्तव्य भोवलं

दरम्यान गुरूवारी शरद पवार यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी पुण्यातील दोन कुटुंबांची भेट घेतली. यावेळी त्यांना मृत संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरीने हल्ल्याची संपूर्ण माहिती दिली. माझ्या वडिलांना हिंदू म्हणून गोळ्या घातल्या, असं ती म्हटली. तर कौस्तुभ गनबोटेंच्या पत्नी संगीता यांनी म्हटलंय की, अतिरेकी हिंदूंना टार्गेट करत असल्याचे पाहून आम्ही महिलांनी कपाळावरील टिकल्या काढून फेकल्या. तरी देखील अतिरेक्यांनी आमच्या कपाळावरील कुंकू पुसले. परंतु, शरद पवारांनी अतिरेक्यांनी हिंदू म्हणून गोळ्या घातल्याबाबतचे सत्य माहिती नसल्याचं म्हटलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube