Jitendra Awhad : महेश आहेर यांच्या ऑफिसमध्ये नोटांचा ढीग, आव्हाडांकडून व्हिडीओ ट्विट

Jitendra Awhad : महेश आहेर यांच्या ऑफिसमध्ये नोटांचा ढीग, आव्हाडांकडून व्हिडीओ ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad )  यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर निशाणा साधला आहे. महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर ( Mahesh Aaher )  यांच्या केबिनमध्ये त्यांचा सगळा जमा खर्च सांभाळणारे श्री. म्हाडसे ह्या व्हिडीओ मध्ये पैसे मोजताना दिसत आहेत, असा आरोप त्यांनी या व्हिडीओद्वारे केला आहे.

या पार्श्वभूमीवर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावायाला जीवे मारण्यासंबंधी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यावरुन आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी महेश आहेर यांना मारहाण केली होती. महापालिकेच्या आवारातच या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली. या घटनेनंतर राष्ट्रीवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड व इतर सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान हे सर्व प्रकरण त्या ऑडियो क्लिपमुळे सुरु झाले. त्या क्लिपमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावायाला जीवे मारण्याबाबतची चर्चा होती. यावरुन आव्हाड यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते. यानंतर आव्हाड यांचे खासगी सचिव अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर यांच्यासह आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महानगर पालिकेच्या गेटवर आहेर यांच्यावर हल्ला केला.

या ऑडियो क्लिप बाबत आव्हाडांनी देखील माहिती दिली आहे. आव्हाडांना आलेल्या या धमकीच्या सखोल चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पण आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीमुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube