‘अब नंबर किसका ?’ अनिल परब, हसन मुश्रीफ यांना किरीट सोमय्यांचा इशारा

‘अब नंबर किसका ?’ अनिल परब, हसन मुश्रीफ यांना किरीट सोमय्यांचा इशारा

मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब (Anil Parab) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचा उल्लेख करत आता नंबर कुणाचा ? हे मी नाही सांगू शकत असं म्हणत सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे.

अनिल परबांच्या विरोधात आता प्राप्तिकर खात्यानेदेखील साई रिसॉर्ट जप्त केला आहे. अनिल परबांचे साई रिसॉर्ट, त्यांची जमीन प्राप्तिकर विभागाने बेनामी मालमत्ता कायद्यांतर्गत जप्त करण्यात आली. प्राप्तिकर विभागाने हा आदेश महाराष्ट्र सरकारला कळवला आहे. अनिल परबने अगोदर ४ जामीन घेतले. अनिल परबच्या विरोधात रत्नागिरी पोलिसांनी ३ एफआयआर केले आहेत. एक भारत सरकारने तक्रार केली, न्यायालयाने त्याची दखल घेऊन अनिल परबांना जामिनावर सोडलं आहे. म्हणजे अनिल परब ४ गुन्ह्यांमध्ये जामीनावर आहे आणि ४ गुन्हे आणखी दाखल झाले आहेत. अशी माहिती देखील किरीट सोमय्या यांनी दिली.

किरीट सोमय्या म्हणतात, अब नंबर किसका ? आता नंबर कुणाचा ? एका बाजूला हसन मुश्रीफ यांनी १५६ कोटी रुपये कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून मागील तारखांमध्ये नोंदी केल्या, स्वत:च्याच कंपनीचे कर्ज बुडवून बुडीत खात्यात जमा करण्यात आले. मुश्रीफ परिवाराची ३ मुलं जामिनासाठी धावत आहेत.

याबरोबरच, संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकरच्या कंपनी खात्यात मुंबई महापालिका आयुक्तांच्या परवानगीने ३२ कोटी रुपये टाकले जातात. माफिया कंपनीना कोविड सेंटरचे कंत्राटं दिली जात आहेत. या कंपनीच्या एका बँक खात्यात ३२ कोटी रुपये येतात. २० कोटी रुपये त्यातून गायब होतात आणि ज्यांच्या खात्यात गायब होतात, तो उद्धव ठाकरेंचा उजवा हात. असंही सोमय्या यांनी हल्लाबोल केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube