एकीकडे पांडव सेना, तर दुसरीकडे कौरव सेना…; फडणवीसांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
Devendra Fadnavis Manmad sabha : आपली पाडंव सेना असून त्याचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (Prime Minister Narendra Modi) आहे. तर दुसरीकडे राहुल गांधींसोबत 24 पक्षांची खिचडी आहे. त्यांना अजून आपला पंतप्रधान पदाचा चेहराही ठरवता आला नाही. त्यांची सत्ता आल्यास ते संगीत खुर्ची खेळून दरवर्षी नवा पंतप्रधान निवडत बसतील, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी केली.
Shaktimaan Trailer: अंगावर काटा आणणारा ‘शक्तिमान’चा ट्रेलर; स्पृहा जोशी दिसली ‘या’ भूमिकेत
दिंडोरी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ आज मनमाड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. या सभेला संबोधित करतांना फडणवीस म्हणाले, सध्या महाभारताच्या युद्धासारखी परिस्थिती आहे. एका बाजूला पांडव सेना आहे, तर दुसऱ्या बाजूला कौरव सेना आहे. अनेक राजे पाडवांसोबत होते, अनेक राजे कौरवांसोबत होते. कौरवांची संख्या मोठी होती, पण विजय पाडंवाचा झाला. आज देशात हीच परिस्थिती आहे. एकीकडे मोदींची सेना, एकनाथ शिंदेंची सेना, अजित पवारांची सेना, राज ठाकरेंची सेना अशा अनेक संघटना मिळून महायुती तयार आहे. तर राहुल गांधी यांच्याकडे 24 पक्षांची खिचडी आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.
बीडची निवडणूक मी कशी लढले? हे सर्वांना माहितीये…; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा रोख कुणाकडे?
फडणवीस म्हणाले, राहुल गांधींकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही. सकाळी सकाळी उबाठाचा पोपटाला सांगतो की, आम्ही पाच वर्षात पाच पंतप्रधान देऊ…. इंडियाची सत्ता आल्यास ते संगीत खेळून दरवर्षी नवा पंतप्रधान निवडतील. मात्र, ही निवडणूक काही त्यांच्यासाठी काही संगीत खुर्ची आहे का? असा सवाल फडणवीसांनी केला.
फडणवीस म्हणाले, ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही. देशाचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा हे ठवरणारी ही निवडणूक आहे. देशाला सुरक्षित ठेवणारा पंतप्रधान निवडायचा आहे, असं फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले, आपल्या विकासाच्या गाडीचे इंजिन मोदी आहे. या इंजिनाला वेगवेगळे डबे जोडले आहेत. सर्वांना घेऊन विकासाची गाडी पुढं जात आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी, शरद पवार, मायावती हे सगळे म्हणतात की आम्ही इंजिन आहोत. पण, त्यांच्या गाडीला डबेच नाहीत. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी यांनाच जागा आहे. शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळेंना जागा आहे. तर उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरे यांना जागा आहे. सर्वसामान्यांना त्यांच्या गाडीत जागा नाही, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.
फडणवीस म्हणाले, यापूर्वी देशात अनेक बॉम्बस्फोट झाले, तेव्हा देशाचे पंतप्रधान मूग गिळून बसायचे. ते लाचारी बाळगून अमेरिकेत जायचे. मात्र, मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केले. त्यानंतर कधीही बॉम्बस्फोट झाले नाहीत, असं फडणवीस म्हणाले.