अजितदादांना महायुतीत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज…; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

अजितदादांना महायुतीत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज…; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

Devendra Fadnavis On Ajit Pawar : सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. यंदा महायुतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस देखील सहभागी झाली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) महायुतीसोब जात उपमुख्यमंत्रीपद मिळवलं. तसंत त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांनाही मंत्रिपदं मिळाली. मात्र, अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत सहभागी झाली तेव्हा भाजपचा मतदार नाराज झाला होता, असं खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं.

प्रेक्षकांनो, तयार व्हा ‘मल्हार’ येतोय 31 मे रोजी भेटीला; हिंदी, मराठीमध्ये होणार प्रदर्शित 

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, एकनाथ शिंदे हे केवळ लोकसभा निवडणुकच नाही तर विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री राहतील. आम्ही शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूकही लढवणार आहोत. विधानसभा निवडणुकीनंतर काय करायचे ते आमचा पक्ष ठरवेल. पण वापरा आणि फेकून द्या, हे आमचे धोरण नाही. आमची महायुती आचेह. महायुतीत विधानसभा पार पडेपर्यंत शिंदेंच मुख्यमंत्री राहतील.

Solapur Loksabha : मतदान झालं! कोण उधळणार गुलाल? उमेदवारांची वाढली धाकधूक 

पुढं बोलतांना फडणवीस म्हणाले, शिंदेंच्या शिवसेनेसोबत झालेली युती ही भावनिक असून राष्ट्रवादीसोबत झालेली युती ही राजकीय असल्याचं फडणवीस म्हणाले.

अजित पवार हे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत महायुतीचा घटक झाल्यानं भाजपचा मतदार रागावला होता. पण शेवटी अजितदादांच्या वर्तनामुळे आता अवमान होणार नाही याची खात्री त्यांना झाली आहे. त्यामुळे भाजपचा मतदार खडकवासला मतदारसंघात कसा मतदान करतो, हे बारामतीच्या निकालात दिसेल, असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

मराठी मतदार फक्त शिवसेनेच्या पाठीशी आहे हा एक समज आहे. 2017 च्या नागरी निवडणुकीत आम्ही त्यांच्या विरोधात 84 जागांपैकी 82 जागा जिंकल्या. 2014 मध्ये आम्ही विधानसभा निवडणूक वेगळी लढवली आणि भाजपला सेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या. 2019 मध्ये आम्ही युती म्हणून लढलो आणि सेनेने आमच्यापेक्षा एक जागा जास्त लढवली पण त्यांना पाच जागा कमी मिळाल्या. मोदींच्या लोकप्रियता जात आणि भाषेच्या पलीकडे आहे, असं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेसपेक्षा शिवसेनाकडून तुष्टीकरण जास्त केले जात छआहे. ठाकरेंच्या सभेत शिवसेनेची शाल घालणाऱ्यांकडून अल्लाह-हो-अकबरच्या घोषणा दिल्या जात आहे. मराठी मतांची उणीव मुस्लिम मतांनी भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असंही फडणवीस म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज