Valentine Day Special : राजकारणातील लव्हस्टोरीज : प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड आणि नवनीत राणा

  • Written By: Published:
Valentine Day Special : राजकारणातील लव्हस्टोरीज : प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड आणि नवनीत राणा

१४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) अर्थात प्रेमाचा दिवस. तसं प्रेम हा एका दिवसाचा विषय नसतो पण तरीही आजच्या दिवशी खास करून प्रेमाची विशेष चर्चा होते. म्हणून आजच्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातील काही गाजलेल्या प्रेमस्टोरीचे काही किस्से

जितेंद्र आव्हाड आणि ऋता सामंत

जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्रातील फायरब्रँड नेते मानले जातात. पण त्यांचीही लव्हस्टोरी इंटरेस्टिंग आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता सामंत या कामगार नेते दत्ता सामंत यांच्या भावाची मुलगा.

आव्हाड यांचे वडील ज्या कंपनीमध्ये कामाला होते, त्या कंपनीमध्ये दत्ता सामंत यांची कामगार युनियन होती. दत्ता सामंत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या वडिलांची चांगली मैत्री होती. पुढे जेव्हा दत्ता सामंत यांनी निवडणूक लढवली तेव्हा ऋता सामंत आणि जितेंद्र आव्हाड यांची ओळख झाली. याच कारण म्हणजे दत्ता सामंत यांनी निवडणूक लढवली तेव्हा आव्हाड यांचे घर जेवणाचा अड्डा होता.

पुढे जितेंद्र आव्हाड राजकारणात सक्रिय झाले. नोकरी-राजकारण याची ऍडजेस्टमेंट करत त्यांनी ऋता यांच्याशी लग्न केलं. ऋता यांनी एअर होस्टेस म्हणून नोकरी केली. घर सांभाळत जितेंद्र आव्हाड यांच्या राजकारणाला साथ दिली. त्यामुळे जितेंद्र आव्हाड आजही सांगतात, “घर उभारण्यात तिचं मोठं योगदान आहे”

प्रसाद लाड आणि नीता लाड

आजघडीला देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू नावामध्ये प्रसाद लाड यांचे नाव घेतलं जात. प्रसाद लाड यांच्या राजकीय प्रवासाप्रमाणेच त्याची प्रेमकहाणीमधेही मोठा ट्विस्ट आहे.

नीता लाड या आमदार बाबुराव भापसे यांच्या कन्या. बाबुराव भापसे यांचा मुंबईमध्ये मोठा दबदबा होता. तेव्हा मुंबईतल्या अंडरवल्ड मध्येही त्यांचा संपर्क होता. पण या बाबुराव भापसे यांच्या कन्येशी प्रसाद लाड यांना प्रेम झालं.

प्रेमात पडल्यावर दोघांनी लग्न करायचं ठरवलं पण घरच्यांचा होकार मिळेल असं वाटत नव्हतं, शेवटी दोघांनी पळून जाऊन लग्न करायचा निर्णय घेतला. प्रसाद लाड यांनी आमदारांच्या मुलीशी पळून जाऊन लग्न केलं.

बाबुराव भापसे यांनी आपल्या मुलीला म्हणजे नीता यांना सांगितलं की, “तुझा जन्म झाला तेव्हा माझी कारकीर्द बहरली. मी आमदार झालो. आता तुझं नशीब तुझा नवरा आहे. नवऱ्यासोबत पुढे चल.”

नीता यांच्या पाठिंब्यावरच प्रसाद लाड यांनी आधी उद्योगात आणि त्यांनतर राजकरणात आपला ठसा उमठवला.

रवी राणा आणि नवनीत राणा

रवी राणा आणि नवनीत राणा हे राज्यातील सर्वाधिक गाजलेली जोडी आहे. रवी राणा आणि नवनीत यांची ओळख २००९ च्या दरम्यान मुंबईत झाली. २००९ मध्ये पहिल्यांदाच रवी राणा हे बडनेरातून आमदार झाले होते, त्या काळात रवी आणि नवनीत यांची ओळख बाबा रामदेव यांच्या शिबीरात झाली होती.

त्यावेळी रवी राणा आमदार होते तर नवनीत कौर या अभिनेत्री, मॉडेल होत्या. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आणि भारतीय सिनेसृष्टीत नवनीत यांनी काम केलं आहे. रामदेवबाबांच्या योग शिबिरात या दोघांची ओळख झाली. या ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं. त्या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

रवी राणा आणि नवनीत या दोघांचं लग्न अमरावतीत सामुदायिक विवाह सोहळ्यात झालं आहे. असं सांगितलं जात की त्यावेळी ठरवलं असतं तर रवी राणा हे थाटामाटात लग्न करू शकले असते. मात्र या दोघांनी साधेपणाने लग्न केलं आणि एक वेगळा आदर्श निर्माण केला. एवढंच नाही तर रवी राणा आणि नवनीत यांनी लग्नाला येणारी खर्चाची रक्कम ही गरीबांमध्ये दान केली.

रवी राणा यांनी २००९ साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि ते जिंकले. त्यानंतर सलग तीनवेळा त्यांनी ही निवडणूक जिंकली आहे. रवी राणा यांच्याशी लग्न केल्यानंतर नवनीत राणा या देखील रवी राणा यांच्यासह राजकारणात सक्रिय झाल्या. २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी शिवसेनेच्या खासदार आनंदराव अडसूळ यांनी त्यांचा पराभव केला. यानंतरही सक्रिय राहत २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडक लढवली. तसंच आनंदराव अडसुळ यांना हरवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube