पक्ष सोडल्यानंतर गोऱ्हेंची पहिली चिठ्ठी; पण, उद्धव ठाकरेंनी ‘सस्पेन्स’ ठेवला कायम

पक्ष सोडल्यानंतर गोऱ्हेंची पहिली चिठ्ठी; पण, उद्धव ठाकरेंनी ‘सस्पेन्स’ ठेवला कायम

प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी )

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नीलम गोऱ्हे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आमनेसामने आले. अधिवेशन काळात नियमानुसार हजर राहण्यासाठी उद्धव ठाकरे विधानपरिषदेत आले होते. विधानपरिषदेच्या उपसभापती म्हणून गोऱ्हे याही सभागृरहात हजर होत्या. यावेळी सभागृहात घडलेल्या एका प्रसंगाची चांगलीच चर्चा झाली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज विधिमंडळात आले होते. विधान परिषदेत नियमानुसार हजेरी लावण्यासाठी ते आले होते. उद्धव ठाकरे विधीमंडळ परिसरात आले तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात ते काही वेळ बसले. त्यानंतर ते विधानपरिषद सभागृहात आले त्यावेळी दुपारचे एक वाजून पाच मिनिटे झाली होती.

विधानपरिषद विरोधी पक्षनेता शेजारच्या बाकावर बसले. सतेज पाटील, एकनाथ खडसे यांच्याशी गप्पा मारत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे पीठासन अधिकारी होत्या. ठाकरे सभगृहात येऊन सुमारे आर्धा तास झाला. नियमांनुसार सदस्याला एका अधिवेशनात अर्धा तास सभागृहात उपस्थित रहाणे आवश्यक आहे. अर्धा तास झाल्यानंतर उद्धव ठाकरे जायला निघाले.

CM शिंदे साईड लाईन! भाजप-राष्ट्रवादीची रणनीती; PM मोदींची अजितदादा, पटेलांशी बंद दाराआड चर्चा

देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना नमस्कार

त्याच वेळी निलम गोऱ्हे यांनी एका कागदावर काहीतरी लिहीले. मार्शल मार्फत ही चिठ्ठी उद्धव ठाकरे यांना दिली. उद्धव ठाकरे यांनी ती चिठ्ठी हातात घेतली तशीच टेबलावर ठेवली. ती चिठ्ठी उघडूनही पाहिली नाही. त्यावेळी उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात आले. देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना नमस्कार केला पण त्याकडे त्यांचे लक्ष नव्हते. अखेर फडणवीस यांनी अनिल परब यांना हातवारे करुन उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले . त्यावेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांना हात जोडून नमस्कार केला.

उद्धव ठाकरेंनी चिठ्ठी पाहिलीच नाही पण..

सुमारे पाऊण तास ठाकरे सभगृहात होते. निलम गोऱ्हे यांनी दिलेली चिठ्ठीही टेबलावर पडली होती. उद्धव ठाकरे चिठ्ठी पाहणार नाही असंच उपस्थित असलेल्या सर्वांना वाटतं होतं. पण अखेर त्यांनी सभगृहातून बाहेर जाताना ती चिठ्ठी ही सोबत घेऊन गेले. नीलम ताई यांनी त्या चिठ्ठीत नेमकं काय लिहलं होतं? हे काही समजू शकले. याच प्रसंगाची आज विधीमंडळ परिसरात चर्चा होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube