राज्यात पॉझिटिव्ह बदल होत असेल तर चांगलेच; नार्वेकरांचे सूचक विधान

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 20T180010.371

Rahul Narwekar :   गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र यावर खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. मी राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले.

दोन दिवसांपूर्वी  जेव्हा ही चर्चा सुरु होती तेव्हाचा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आपला जपानचा दौरा अर्ध्यावर सोडून राज्यात यायला निघालेत अशी बातमी आली होती. त्यामुळे या सर्व चर्चांना आणखीनच वेग आला होता. पण आता खुद्द राहुल नार्वेकर यांनी याबाबत खुलासा केला आहे. मी माझ्या महत्वाच्या बैठका उरकून इथल्या महत्वाच्या बैठका घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले आहे.

राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; अजित पवारांचं राज्यपालांना पत्र

शासनाच्या कामाचा वेग चांगला दिसून येते आहे. विधीमंडळात विधीमंडळातील सदस्य चिकाटीने काम करत आहेत. दिवसाचे साडे नऊ तास कामकाज झालेले आहे. 150 हून जास्त लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली आहे. त्यामुळे अशा पॉजिटिव्ह वातावरणात आणखी कोणता पॉजिटिव्ह बदल होणार असेल तर त्याचे स्वागत असल्याचे, सूचक विधान नार्वेकरांनी केले आहे.

राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; अजित पवारांचं राज्यपालांना पत्र

दरम्यान, राहुल नार्वेकर हे जपानचा दौरा अर्ध्यावर सोडून आल्याची चर्चा होती. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. याआधी शिंदे सरकार स्थापन होताना राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी  निवड करण्यात आली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube