‘कुणी सोबत आलं तरी चौकशी थांबणार नाहीच’; भाजप आमदाराचा रोखठोक इशारा
Ram Kadam : राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठविणाऱ्या भाजपातील काही आमदारांची मोठी अडचण झाली आहे. यामध्ये आमदार राम कदम यांचेही नाव आघाडीवर आहे. अजित पवार यांच्याबरोबर काही आमदार सरकारमध्ये आल्यानंतर मात्र कदम यांनी टीकेची तलवार म्यान केल्याचे दिसत आहे.
लेट्सअप मराठी प्रतिनिधीने आज विधीमंडळ आवारात आ. कदम यांच्याबरोबर संवाद साधला. यावेळी चांगल्या कामसाठी जो कुणी आमच्याबरोबर येईल त्याचं स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया कदम यांनी दिली. मात्र, सरकारसोबत आले म्हणून ज्यांची चौकशी सुरू आहे ती थांबणार नाही असेही स्पष्ट केले.
‘उद्धव ठाकरेंना ‘अल्झायमर’, न्यूरो सर्जनकडून उपचार घ्या’; वाढदिवशीच बावनकुळेंचा खोचक टोला
एकवेळ त्यांच्यावर जोरदार टीका करत होते आता मैत्री करताना काय बदल जाणवतो? या प्रश्नावर उत्तर देताना कदम म्हणाले, पक्षशिस्त कुणाकडून शिकायची असेल तर ती भारतीय जनता पार्टीच्या कर्मठ कार्यकर्त्याकडून शिकली पाहिजे. त्याग आणि समर्पणाची भावना काय असते हे जर समजून घ्यायचं असेल तर ते संघाच्या स्वयंसेवकाकडून समजून घ्यावं. आम्ही त्यांच्यावर निश्चित प्रहार केले. पण आता पंतप्रधान मोदींच्या विकास कामांवर सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन जर कुणी आमच्याबरोबर आलं आणि त्यानंतर पक्षाने एकदा निर्णय घेतला की तो आदेश असतो. त्या आदेशाचे पालन केलं जातं.
चौकशी यंत्रणा स्वतंत्र, चौकशी करणारच
काल भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आज एकदम स्वच्छ कसे होतात, असेही लोक बोलतात त्याचं काय? या प्रश्नावरही कदम यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, तसं नाही हे फक्त तुमच्या प्रसारमाध्यमांचं म्हणणं आहे. कुणीही पक्षात आला म्हणून त्याची चौकशी थांबलेली नाही. चौकशी यंत्रणा स्वतंत्र आहेत. त्या चौकशी करणार. पण जर कुणी पॉजिटिव विचार दाखवला तर त्यांना आम्ही काय म्हणायचं की नका येऊ. जो चांगल्या कामासाठी सोबत येईल त्याचं आम्ही स्वागतच करू, असे कदम म्हणाले.
उद्धव ठाकरेंचे तेच ते ‘डायलॉग’; स्क्रिप्ट बदलण्यासाठी भाजप आमदाराचं ठाकरेंना खास ‘गिफ्ट’