अब्दुल सत्तारांना दणका! वजनदार ‘कृषी’ खातं काढलं; आता मिळालं ‘हे’ खातं

अब्दुल सत्तारांना दणका! वजनदार ‘कृषी’ खातं काढलं; आता मिळालं ‘हे’ खातं

Abdul Sattar News : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून शिंदे-फडणवीस सरकारबरोबर आलेल्या अजित पवार गटातील मंत्र्यांना अखेर आज खातेवाटप करण्यात आले. अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांना अर्थ खाते मिळाले आहे. तसेच अन्य मंत्र्यांनाही वजनदार खाते मिळाले आहेत. या खातेवाटपात मात्र शिंदे गट आणि भाजपातील काही मंत्र्यांची खाती काढून घेतली गेली आहेत. शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांना जोरदार झटका बसला आहे.

सत्तार यांच्याकडीक कृषी खाते काढून घेतले आहे. आता धनंजय मुंडे यांना कृषी खाते देण्यात आले आहे. अब्दुल सत्तारांना अल्पसंख्यांक मंत्री करण्यात आले आहे. बजेट आणि विस्ताराचा विचार केला तर कृषी खाते मोठे होते. या विभागाला मिळणारे बजेटही जास्त असते. सत्तार यांच्या रुपाने हे वजनदार खाते शिंदे गटाकडे होते. मात्र नव्या खांदेपालटात त्यांच्याकडून हे खाते काढून घेण्यात आले आहे.

शिंदे गटाकडील तीन तर भाजपकडील सहा वजनदार खाते अजित पवार गटाला, कोणाचं खातं कोणाला मिळालं?

तसे पाहिले तर सत्तार मागील काही दिवसांपासून चांगलेच वादग्रस्त ठरले होते. निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्यामुळे नवे संकट त्यांच्यासमोर उभे राहिले. बियाण्यांवरील कारवाईवरूनही मध्यंतरी त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. तसेच त्यांच्याकडून होत असलेल्या वक्तव्यांवरूनही त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. अशा परिस्थितीत आता त्यांच्याकडील कृषी खाते काढून त्यांना अल्पसंख्याक मंत्रालय देण्यात आले आहे. शिंदे गटासाठी हा एक झटकाच मानला जात आहे.

सावे आता गृहनिर्माण मंत्री

भाजपातील मंत्री अतुल सावे यांचेही खाते काढून घेण्यात आले आहे. आधी त्यांच्याकडे सहकार खाते होते. आता त्यांचे खाते आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आले आहे. सावेंकडे गृहनिर्माण खात्याचा कारभार देण्यात आले आहे.

शिंदे गटाची वजनदार खाती गेली

खातेवाटपामध्ये एकनाथ शिंदे गटाकडून अजित पवार गटाला तीन खाती गेली. त्यात अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषी खाते हे राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते धनंजय पंडितराव मुंडे यांच्याकडे देण्यात आलं. सत्तार यांच्याकडील कृषी खाते जाणार अशी आधीपासूनच चर्चा होती. आणि आता खातेवाटप झाल्यानंतर त्यांच्याकडील हे खातं काढून घेण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडील मदत आणि पुनर्वसन मंत्रीपद हे अनिल पाटील यांनी मिळालं आहे. आणि शिंदे गटाच्या संजय राठोड यांच्याकडे असलेलं अन्न आणि औषध प्रशासन हे खातं आता पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान मिळवणारे विदर्भातील धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम यांना मिळालं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube