शरद पवार अन् अजितदादांकडे आमदार किती? मनसेचा नेताही झाला कन्फ्यूज
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता दोन गट पडले आहेत. पण कोणत्या गटाकडे किती आमदार आहेत हे अजूनही कळलेलं नाही. प्रत्येक गट आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा करत असला तरी खरे काय अजूनह कळलेलं नाही. मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही याच मुद्द्यावर भाष्य केले आहे.
प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगळी आहे. त्यानुसार त्यांचं राजकारण चालतं. पण राष्ट्रवादीचं पहाल तर अजितदादा कोणत्याही स्टेजवर जातात. अर्थात ते सत्तेत आहेत. अजितदादा भाजपसोबत आहेत. सुप्रिया सुळे भाजपविरोधात बोलतात हा थोडा घोळच आहे. अधिवेशन झालं तरी शरद पवार गटाकडे किती आणि अजित पवार गटाकडे किती आमदार आहेत हे कळलंच नाही. म्हणजे, एनसीपीचे आमदार किती आणि विरोधी पक्षातील किती हे समजलेच नाही. हेच शरद पवार यांचे राजकारण आहे, असे पाटील म्हणाले.
न्यायव्यवस्था तुम्हाला गंमत वाटली का? न्यायालयाने राणा दाम्पत्याला फटकारले !
उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यावरही पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकर यांच्या जुन्या भाषणांच्या काही क्लिप्स आहेत. राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी त्या संग्रहीत करून ठेवल्या आहेत. अशी माहिती आहे की राज यांनी तो संग्रह उद्धव यांना दिला होता. माझी अशी मागणी आहे की बाळासाहेबांचे स्मारक खरोखरच चांगले करायचे असेल तर राज यांच्या व्हिजनने आणि विचारांनी व्हायला पाहिजे.