शिंदे-फडणवीस, पवारांच्या महायुतीत ‘कोकण कन्या’ तटकरेंनी मारली बाजी

शिंदे-फडणवीस, पवारांच्या महायुतीत ‘कोकण कन्या’ तटकरेंनी मारली बाजी

Aditi Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दाखल झालेल्या अजित पवार गटातील मंत्र्यांना अखेर आज खातेवाटप करण्यात आले. या खांदेपालटात भाजपकडील सहा तर शिंदे गटाकडील तीन वजनदार खाती काढून घेण्यात आली. सर्वात महत्वाचे म्हणजे, एकही महिला मंत्री नाही म्हणून सरकारला कोंडीत पकडणाऱ्या विरोधकांना उत्तर देण्यात आले आहे. अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या रुपाने शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये पहिल्या महिला मंत्र्याने एन्ट्री घेतली आहे. तटकरे यांना महिला बालविकास मंत्रालयचा खात्याचा कार्यभार देण्यात आला.

काही दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरू होती. शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आपल्यालाच मिळायला पाहिजे असे ठणकावले होते. तसेच त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीने आंदोलनही केले होते.

‘चाणक्य अन् त्यांची कुटनीती कुटून बारीक करणार’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार

पालकमंत्री पदाचा वादही उफाळला

तटकरे यांच्याकडे महिला बालकल्याण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पण, त्यांच्याकडे रायगड जिल्ह्याचेही पालकमंत्रीपद देण्यात येईल अशी चर्चा होत आहे. त्यामुळे गोगावले यांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्येही अदिती तटकरे यांच्याचकडे रायगडचे पालकमंत्री पद होते. त्यावेळी गोगावले यांनी त्यांना बदलण्याची मागणी केली होती.

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर भाजप 9 आणि शिंदे गटातील 9 अशा 18 जणांना शपथ घेतली होती. मात्र, यामध्ये एकाही महिला मंत्र्याचा समावेश नव्हता. त्यामुळे सरकावर महाविकास आघाडीकडून सातत्याने टीका केली जात होती. या टीकेवर ठोस उत्तर नसल्याने महिला मंत्र्याला मंत्रिमंडळात लवकरच घेतले जाईल असे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात होते.

आधीही रायगडच्या पालकमंत्री

अदिती तटकरे सध्या 33 वर्षांच्या आहेत. त्या 31 वर्षांच्या असतानाच त्यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्याकडे उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा, व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. तरी देखील त्यांच्याकडे इतक्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती.

शिंदे गटाकडील तीन तर भाजपकडील सहा वजनदार खाते अजित पवार गटाला, कोणाचं खातं कोणाला मिळालं?

झेडपी सदस्य ते कॅबिनेट मंत्री

अदिती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्याआधीपासून त्या राजकारणात सक्रिय होत्या. 2011-2012 मध्ये त्यांनी पक्ष वाढविण्यास सुरुवात केली. 2012 पासून त्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कोकण विभाग संघटक म्हणून काम पाहत आहेत. 23 फेब्रुवारी 2017 रोजी रोहा तालुक्यातील वरसे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या विजयी झाल्या. 21 मार्च 2017 रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. अध्यक्ष म्हणून त्यांनी दोन वर्षे काम पाहिले. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्या श्रीवर्धनमधून आमदार म्हणून निवडून आल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube