‘देवेंद्रजी हिंमत असेल तर त्या व्यक्तीचं नाव जाहीर करा, अन्यथा’.. ठाकरे गटाच्या खासदाराचं थेट चॅलेंज!

‘देवेंद्रजी हिंमत असेल तर त्या व्यक्तीचं नाव जाहीर करा, अन्यथा’.. ठाकरे गटाच्या खासदाराचं थेट चॅलेंज!

Maharashtra Politics : कोकणातील बारसू प्रकल्पावरून सत्ताधारी भाजप आणि ठाकरे गटात अजूनही आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारसू प्रकल्पाचा मुद्दा थेट विधानपरिषदेत उपस्थित करत खळबळजनक आरोप केले होते. बारसू प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणारे हे बंदी घातलेल्या ग्रीनपीस या संघटनेशी संबंधित असून त्यांनी या संघटनेचा पैसा येतो, असा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपावर आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे.

पनवेल-नांदेड ट्रेन प्रवाशांनी रोखली, झुरळांचा बंदोबस्त केला तरच ट्रेन पुढे जाऊ देणार

अरामको कंपनीची दलाली घेतल्यासारखं देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलं. त्याचा मी धिक्कार करतो. हिंमत असेल तर गृहमंत्रीपदाचा वापर करून बारसूमध्ये आंदोलन करणाऱ्या कोणत्या व्यक्तीला बंगळुरूतून पैसे मिळतात, त्याचं नाव जाहीर करा. जर,हिंमत नसेल तर विधानपरिषदेत वक्तव्य मागे घ्यावे अन्यथा राजीनामा द्यावा, असे आव्हान विनायक राऊत यांनी दिले.

फडणवीस काय म्हणाले ?

राज्य सरकारकडून विलंब झाल्याने कोकणातील तेल शुद्धीकरण प्रकल्पात गुंतवणूक करणारी कंपनी अरामको पाकिस्तानात गेली आहे. तरीही केंद्र सरकारच्या मालकीच्या तेल कंपनीच्या मदतीने कोकणात बारसू येथे तेलशुद्धीकरण प्रकल्प होईल. ज्यांना देशाचा विकास नको आहे, असे लोक या प्रकल्पाला विरोध करत आहेत. आरे, बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विरोधातही तीच माणसे होती. ही माणसे वारंवार बंगळुरूमध्ये जातात. त्यांच्या बँक खात्यात भारतात बंदी घातलेल्या ग्रीनपीस या संघटनेकडून पैसे येतात, असा आरोप त्यांनी केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube