मोदींनी आणखी सभा घ्याव्या, त्यांच्या जेवढ्या सभा होतील, तेवढं आम्हाला बहुमत…; पवारांचा टोला
Sharad Pawar PC : लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) राज्यात 18 सभा घेतल्या होत्या. त्या बहुतांश ठिकाणी महायुतीचे उमेदवार पडले. यावरून शरद पवारांनी (Sharad Pawar) मोदींवर खोचक टीका केली. आगामी विधानसभा निवडणुकीतही मोदी जितक्या जास्त सभा घेतील, तितक्या ताकदीने महाविकास आघाडीने बहुमताच्या जवळ जाईल, अशी टीका पवारांनी केली.
…तर मंगळसूत्र चोरणार हे मोदींचं नरेटिव्ह खरं होतं का? उद्धव ठाकरेंचे जशास तसं उत्तर
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज महाविकास आघाडीची पहिली बैठक पार पडली. मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, आमच्याकडून एक महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. ती म्हणजे, महाराष्ट्रात ज्या काही अन्य पक्षांच्या सभा झाल्या, देशाच्या पंतप्रधानांच्या 18 सभा आणि एक रोड शो झाला. त्यांच्या सभा ज्या ठिकाणी झाल्या, त्या ठिकाणी आमच्या उमेदवारांना जनतेनं मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या वेळीही पंतप्रधान जितक्या जास्त सभा घेतील, तितकं आमची बहुमताकडे वाटचाल होईल. त्यामुळे पंतप्रधान मोदींचे आभार मानणे मी माझे कर्तव्य समजतो, असे पवार म्हणाले.
Government Schemes : नाबार्ड डेअरी लोन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
पुढं बोलतांना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने महायुतीचा पराभव केला. याची अनेक कारणे आहेत. त्यातील एक कारण म्हणजे, सत्तेचा दुरूपयोग. सत्तेचा दुरूपयोग होत असल्यानं भाजपचा पराभव झाला. सत्तेचा दुरुपयोग होत असल्यानं लोकांनी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली. तीन-चार महिन्यात लोक विधानसभेतही ठोस भूमिका घेतील, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ही पत्रकार परिषद महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी आहे. लोकशाही वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला मोठे यश मिळवून दिलं. आम्ही ही निवडणूक प्रंचड धनशक्ती विरोधात लढवली. सत्ताधाऱ्यांनी धार्मिक ध्रुवीकरणाचाही प्रयत्न केला, मात्र, त्यात त्यांना यश आलं नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, आता भाजप आणि महायुतीचे नेते पवारांच्या वक्तव्यावर काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.