जागावाटपावरून ‘मविआ’त खलबतं सुरू, आंबेडकर बैठकीतून बाहेर पडले; नेमकं काय ठरलं?

जागावाटपावरून ‘मविआ’त खलबतं सुरू, आंबेडकर बैठकीतून बाहेर पडले; नेमकं काय ठरलं?

Lok Sabha elections : लोकसभा निवडणुकीच्य (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर राज्यात बैठकांचा सिलसिला सुरू आहे. महायुतीसोबतच महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) जागावाटपाच्या चर्चांना आता चांगलाच वेग आला. आज मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची शक्यता आहे. हॉटेल फोर सिझनमध्ये मविआची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष शरद पवार, प्रकाश आंबेडकरही (Prakash Ambedkar) सहभागी झाले होते. तीन तासांच्या बैठकीनंतर आंबेडकर हॉटेलमधून बाहेर पडले. यावेळी त्यांनी माध्यमांसमोर फारशी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

मुंबई महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा! चहल, सुधाकर शिंदेंची बदली करा, वडेट्टीवारांची मागणी 

सध्या जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका होत आहेत. वंचित आणि मविआत जागावाटपावरून एकमत नसल्यचाी चर्चा असतांना आज आंबेडकरही बैठकीला हजर झाले. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. आजच्या बैठकीत फारसे निर्णय झाले नाहीत. मात्र पुढील बैठकीत निर्णय घेतला जाईल, असं आंबेडकर यांनी सांगितले.

वंचितची अमरावती, सोलापूर जागा लढवण्याची इच्छा
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोर सीझन्स हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरील कॉन्फरन्स हॉलमध्ये ही बैठक होत आहेत. तिथे सर्व चर्चा सुरू आहेत. आतापर्यंत 39 जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. वंचित बहुजन आघाडीने अमरावती, सोलापूर आणि अकोला या जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

माझिरेंचा मनसेनंतर आता शिंदेंनाही दे धक्का; राजीनाम्याच्या तयारीत

याशिवाय वंचित मुंबईतील एका जागेवर निवडणूक लढविण्याचा विचार करत आहे. त्यामुळे वंचितांना जागा मिळणार का, वंचित मविआत एक घटकपक्ष म्हणून सोबत येणार का आणि प्रचाराची धुरा सांभाळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महाविकास आघाडीमधील 9 जागांवरचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे.

जानकर माढ्यातून लढणार?
दरम्यान, महादेव जानकर माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या विषयावर शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. याबाबतचा अधिकृत निर्णय दोन दिवसांत घेतला जाणार आहे. मात्र, आपण अद्याप कोणत्याही युती किंवा आघाडीसोबत गेला नसल्याचं जाणकर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, वंचित बहजून आघाडी आणि मविआ यांच्यात जागावाटपाचा ताळमेळ बसत नसल्याची चर्चा आहे. याविषयी राऊतांना विचारले असता राऊत म्हणाले की, आंबेडकरांची भूमिका संशयास्पद वाटत नाही. आंबेडकरांचे मायावतींसारख नाही. ते भाजपला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कुठलीही मदत करणार नाहीत, असं राऊत म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube