आता ठराव मांडतो, अजितदादांना करा मुख्यमंत्री: भास्कर जाधव यांचे भाजपला आव्हान

आता ठराव मांडतो, अजितदादांना करा मुख्यमंत्री: भास्कर जाधव यांचे भाजपला आव्हान

Bhaskar Jadhav on Ajit Pawar : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजप नेत्यांना थेट विधानसभेत आव्हान दिले. आता अजितदादांना (Ajit Pawar) मुख्यमंत्री करा, मी पाठिंबा देतो, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter session) भास्कर जाधव यांनी ही मागणी केली आहे. आता ठराव मांडतो, मला तुमचा दम बघायचा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की मी कुठंही टीका करत नाही. चांगले निर्णय घेतले तर मी चांगलेच म्हणत असतो. कुठं काही झालं की हे लगेच अडीच वर्ष, अडीच वर्ष. दुसरं काही दिसत नाही? अजितदादा अडीच वर्षे मंत्रिमंडळात होते. आताही त्या मंत्रिमंडळात आहे. मी त्यांनाच साद घालतोय. जिथून प्रश्न सुटणार असतील तिथून सोडवले पाहिजेत. मी कोणावर टीका केली का? तरीपण ह्यांना सारखे अडीच वर्षे खुपतात, असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी भाजपवर केला.

नागपूर अधिवेशनात कर्जत एमआयडीसीचा मुद्दा गाजणार ! उद्योगमंत्र्यांची बैठक, अधिसूचना निघणार ?

अजितदादांना करा मुख्यमंत्री, पाठिंबा देतो, आता सभागृहात ठराव मांडतो. तुमच्यातला दम बघायचा आहे. माझ्या पक्षाची हमी मी घेतो. चला दादांना आता मुख्यमंत्री करा. तुम्ही ज्याच्यासोबत मैत्री केली त्यांचे वाटोळं केलं, अशी टीका करत भास्कर जाधव यांनी भाजपला आव्हान दिले.

Maratha Reservation : मनोज जरांगेंना तातडीने रुग्णालयात हलवलं…नेमकं काय झालं?

कोरोना कोणी आणला? कोरोना तुम्हीच आणला. का वेळेवर विमानतळ बंद केले नाहीत? झोपाळ्यावर झोका घेत ढोकळा खात बसले आणि मग देश बंद केला. कोरोना तुमच्यामुळे आला. आणि महाराष्ट्र ठप्प झाला, अशी टीका भास्कर जाधव यांनी भाजपवर केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube