“चव्हाणांच्या माध्यमातून सूड, दुसऱ्या चालीत शिंदेंचा माणूस; प्रुफ मिळताच…”

“चव्हाणांच्या माध्यमातून सूड, दुसऱ्या चालीत शिंदेंचा माणूस; प्रुफ मिळताच…”

Manoj Jarange Criticize to Shinde-Fadanvis : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Shinde ) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, सुडासाठी फडणवीसांचं मराठ्याविरूद्ध षडयंत्र सुरू आहे.

‘आमच्याकडं वडापाव खातात ‘ते’ निवडून येतात’; खासदार लोखंडेंवर अन्सारचाचांची खास डायलॉगबाजी

मनोज जरांगेंचा शिंदे-फडणवीसांवर पुन्हा निशाणा

अशोक चव्हाण यांच्यासोबत काय घडलं? हे मी पाहिलं नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र रचलं आहे. गावातील गोर गरीब मराठा तरुण तरुणांवर ३५३ चे गुन्हा दाखल केले जाते आहेत. या तरुणांनी अशोक चव्हाण यांच्या गाडीजवळ केवळ घोषणा दिल्या असतील. त्यांना मारहाण केलेली नाही. घोषणा देणे पाप नाही. मात्र देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून सूड उगवत आहेत. फडणवीसांचा खेळ भरत आला आहे.

Vaishali Darekar : राज ठाकरेंनी घडवले, श्रीकांत शिंदेंनी शिवसेनेत आणले… आता कल्याणमधून ठाकरेंच्या उमेदवार

तसेच गोदापट्ट्यामध्ये त्यांची नवी रणनिती सुरू आहे. त्याबद्दल मला सविस्तर माहिती नाही. मी पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दल सविस्तर बोलेन. त्यामध्ये एकनाथ शिंदे देखील सामील आहे. कारण तो माणूस शिंदेंचा आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. यासाठी हे सर्व सुरू आहे. गृहमंत्र्यांकडून त्यांच्या पदाचा गैरवापर सुरू आहे. निवडणुकांच्या काळामध्ये तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते ज्या घोषणा देतील. त्यावर 353 चा गुन्हा दाखल करणार का? असा सवाल देखील जरांगे यांनी उपस्थित केला. मात्र मराठे आता याला जशास तसे उत्तर देणार. असा इशाराही जरांगेंनी शिंदे-फडणवीसांना दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज