‘आमच्याकडं वडापाव खातात ‘ते’ निवडून येतात’; खासदार लोखंडेंवर अन्सारचाचांची खास डायलॉगबाजी

‘आमच्याकडं वडापाव खातात ‘ते’ निवडून येतात’; खासदार लोखंडेंवर अन्सारचाचांची खास डायलॉगबाजी

Shirdi Loksabha : आमच्याकडे जे वडापाव खातात ते निवडून येतात, अशी डॉयलॉगबाजी करत संगमनेरचे फेमस वडापाव दुकानाचे मालक अन्सारचाचांनी (Ansarchacha) लोकसभा निवडणुकीसाठी (Shirdi Loksabha) खासदार सदाशिव लोखंडेंना (Sadashiv Lokhande) शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, लोखंडेंची लोकसभा निवडणुकीसाठी सुरु असलेली प्रचारफेरी थेट अन्सारचाचांच्या दुकानात पोहोचली. यावेळी अन्सारचाचांनी लोखंडेंचं स्वागत केलं.

राजू शेट्टींनी ऐकलंच नाही, ठाकरेंनीही हातकणंगलेसाठी पर्याय शोधलाच; सत्यजित पाटलांना तिकीट

सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहु लागलं आहे. राज्यातील निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या सुरु झाल्या आहेत. अशातच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमदेवार सदाशिव लोखंडेंचाही प्रचार सुरु आहे. लोखंडे यांचा आज संगमनेरात प्रचार होता. यावेळी कार्यकर्त्यांसह खासदार लोखंडेंनी चविष्ट वडापावसाठी फेमस असलेले समनापूरच्या अन्सारचाचांच्या वडापावचा स्वाद घेतला.

रत्नागिरी-सिंधुदुर्गात किरण सामंतांची विकेट? राणेंनी दावा ठोकताच निवडणुकीतून घेतली माघार

खासदार लोखंडे येताच अन्सारचाचांनी स्वत: पुढे येत खासदार लोखंडेंच्या हातात हात देऊन त्यांचं स्वागत केलं. लोखंडे यांनी अन्सार चाचांचा हात हातात घेत त्यांचा फेमस डायलॉग ..”खाता की नेता” म्हणताच उपस्थितांसह अन्सार चाचा देखील खळखळून हसले. आणि उत्तरात म्हणाले… “पहिली खाता अन् मग नेता” नेत्या समोर खाता आणि नेता असे यमक योगायोगाने जुळल्याने अन्सार चाचांना हसू आवरले नाही.

दरम्यान, जसजशा निवडणूकीची तारीख जवळ येत आहे तसंतसं प्रचारयंत्रणांना वेग येत आहे. या प्रचारादरम्यान खासदार लोखंडे यांनी अन्सारचाचांच्या वडापावचा स्वाद घेतला. तसेच कार्यकर्त्यांनीही वडापाव खाण्याचा आनंद लुटला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज