राजू शेट्टींनी ऐकलंच नाही, ठाकरेंनीही हातकणंगलेसाठी पर्याय शोधलाच; सत्यजित पाटलांना तिकीट

राजू शेट्टींनी ऐकलंच नाही, ठाकरेंनीही हातकणंगलेसाठी पर्याय शोधलाच; सत्यजित पाटलांना तिकीट

Uddhav Thackeray Announced Candidate for Hatkanangale Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आज आणखी चार उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये हातकणंगले मतदारसंघातही उमेदवार जाहीर करण्यात आला. याच मतदारसंघाच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याबरोबर (Raju Shetti) चर्चा सुरू होती. परंतु, चर्चा निष्फळ ठरली. राजू शेट्टी यांनी टाकलेल्या अटी ठाकरेंना मान्य झाल्या नाहीत आणि ठाकरेंनी केलेली विनंती राजू शेट्टींना मान्य झाली नाही. त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केली.

Uddhav Thackeray : माझ्या घराणेशाहीला विरोध केला तसा तटकरेंना करून दाखवा; ठाकरेंचे मोदींना आव्हान

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत आणखी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये जळगाव मतदारसंघातून करण पवार यांना तिकीट देण्यात आले.  याआधी भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे उमेदवारी कुणाला मिळेल याची उत्सुकता होती. पत्रकार परिषदेत ठाकरेंनी मात्र करण पवार यांचं नाव जाहीर केलं. करण पवार हे सुद्धा  उन्मेश पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.

हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित पाटील यांचे नाव जाहीर केले. या मतदारसंघातील उमेदवारीसाठी माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे नेते राजू शेट्टी यांच्याबरोबर चर्चा सुरू होती. ठाकरे गटाने शेट्टी यांच्यासमोर महाविकास आघाडीत सामील होण्याची आणि मशाल चिन्हावर निवडणूक लढण्याची अट ठेवली होती. परंतु, याला राजू शेट्टींनी नकार दिला. तर राज शेट्टी यांची पाठिंब्याची मागणी ठाकरे गटाला मान्य झाली नाही. त्यामुळे आज उद्धव ठाकरेंनी आज सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केली.

भाजपकडून खरंच ऑफर मिळाली का? राजू शेट्टी म्हणाले, मोठी ऑफर आली तरी…

काँग्रेसने सांगलीत आमच्या उमेदवाराचा प्रचार करावा 

वंचित बहुजन आघाडीने काही मतदारसंघात विरोधात मतदार दिले आहेत असे विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, मी प्रकाश आंबेडकरांबद्दल काही बोलणार नाही. आज जरी जमलं नाही तर भविष्यातही जमणार नाही अशी भूमिका घेऊ नका. आम्ही त्यांच्याबद्दल काहीच बोलणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात अनेक ठिकाणी आमचे उमेदवार नाहीत. तरीदेखील तेथील शिवसैनिकांना समजावून सांगितले. आता तेथे आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचारही सुरू केला आहे. तेव्हा आता काँग्रेसनेही सांगलीत आमच्या उमेदवाराचा प्रचार आता सुरू करावा अशी अपेक्षा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज