Manoj Jarange Patil Narayan Gad Dasara Melava : बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे आज (गुरुवार) मराठा आरक्षणासाठी झगडणारे मनोज जरांगे यांनी आयोजित केलेला दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही हा मेळावा घेण्यात आला असला तरी, राज्यातील अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन यावेळी कार्यक्रम साधेपणाने करण्याचा निर्णय जरांगे यांनी घेतला होता. यावेळी तोफ डागताना मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
हे आपल्याला निवडणुकीअगोदर डवचतात. त्यानंतर ते तीन ते चार महिने गप्प बसतात. ते एक शब्द आपल्या काळजाला लागेल असं बोलतात, जसं की गुलामीचं गॅझेट म्हणणारं भिकार अवलादी (Pankja Munde). गुलामीचं गॅझेट म्हणायचं अन् तीन-तार महिने गप्प बसायचं. आमचं गुलामीचं गॅझेट (Narayan Gad Dasara Melava) आहे, मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? तुमच्या परिवारातील आहे का? असा सवाल देखील जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) केला आहे.
आमचं गुलामीचं गॅझेट आहे, मी त्या नाकतोडीला बोललो का? कोणाला बोट लावायची गरज आहे का? त्यासाठी लोकाच्या लेकराला तुच्छ लेखायचं नाही. आमचं गॅझेट गुलामीचं होतं, म्हणजे आमच्या लेकरांनी तुम्ही गुलाम समाज का? ए मराठ्यांच्या पैदासीहो तुला गुलामीची औलाद म्हटलंय? करतो का प्रचार? दहा-पाच लाखासाठी किती चाटितो रे? हे त्या पक्षात काम करणाऱ्या लोकांसाठी आहे, स्वाभिमान जागा ठेवा. जर आपली गुलामीची पैदास आहे, असं त्यांनी म्हटलं तर मराठ्यांनी का तिथं काम करता? असंही जरांगे यांनी म्हटलंय.
आमचं गुलामीचं गॅझेट निजामाचं आहे, इंग्रज तुमच्या परिवारातला आहे का? म्हणून 1931 जी जनगणना घेतली अन् तुम्ही त्याचं आरक्षण घेतलं? मग तुम्ही कोण? असं आम्ही म्हणायचं का? म्हणलो नाही, असं देखील जरांगे पाटलांनी विचारलं आहे. काहीही बोलता, माजलेले नीट करायची ताकद मराठ्यांमध्ये आहे. तुम्ही राजस्थानला होता, तिकडे बादशहा अकबर होता. त्याने तुम्हाला दांडक्याने ठोकलं. मग तुम्ही इकडे पळून आला, अगं बाई सगळ्यांना बोलता येत. मापात राहावा. यासाठी तीस-तीस वर्ष मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलेलं नाही, असंही जरांगेंनी विचारलं आहे.
जो बोलेल त्याला सोडायचं नाही. दया-माया बंद करा. जे मराठ्यांविरोधात उभे राहतील खपा-खप पाडायचे. ते आपल्याशी तेव्हा चांगले राहतील, असंही जरांगे यांनी म्हटलंय. आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही, असंही जरांगे यांनी म्हटलंय.