‘राज ठाकरे कुचक्या कानाचे.. चंद्रकांत पाटलांनी मराठ्यांच्या शिव्या खाऊ नये…’; मनोज जरांगेंचा जोरदार हल्लाबोल

‘राज ठाकरे कुचक्या कानाचे.. चंद्रकांत पाटलांनी मराठ्यांच्या शिव्या खाऊ नये…’; मनोज जरांगेंचा जोरदार हल्लाबोल

Manoj Jarange Patil on Raj Thackeray Chandrakant Patil : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन चालू आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या आंदोलनावरून नुकतीच टीका केली होती. ‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा विषय सोडवला होता, मग ते परत का आले, असा सवाल राज ठाकरेंनी केला होता’. त्याचप्रमाणे ‘मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त एकनाथ शिंदेच देऊ शकतील’, असेही राज ठाकरे म्हणाले होते. यावरुन मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

पुण्यात रंगारी गणपती बाप्पाचे दर्शन; मान्यवर आणि भक्तांची मोठी गर्दी, पाहा खास PHOTO

काय म्हणाले मनोज जरांगे?
राज ठाकरे यांच्यावर टीका करताना जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले की, “दोघे भाऊ चांगले आहेत, त्यांचा ब्रँड चांगला आहे. पण हा विनाकारण मराठ्यांच्यामध्ये पडत आहे. त्याला 11 ते 13 आमदार निवडून दिले. ते पळून गेले, आम्ही विचारलं का? तुम्ही नाशिकला, पुण्याला, संभाजीनगरला येता आम्ही विचारलं का? फडणवीसांनी लोकसभेला तुमचा गेम केला. विधानसभेला तुमच्या मुलाला त्यांनीच पाडलं. तरी आम्ही विचारलं का? राज ठाकरे म्हणजे मानाला भुकलेलं पोरगं आहे. फडणवीस त्यांच्या घरी चहा पिऊन गेला तरी मग पक्ष बरबाद झाला तरी चालतो. अशाला आमच्या खेड्याकडं कुचक्या कानाचं म्हणतात,” असे म्हणत मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे.

ज्ञान आणि संस्कृतीचा संगम; पीसीईटी इन्फिनिटी रेडिओच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ‘वन्हि तो चेतवावा’ ग्रंथाचे प्रकाशन

चंद्रकांत पाटलांनी मराठ्यांच्या शिव्या खाऊ नये
राज ठाकरेंवर निशाणा साधल्यानंतर जरांगेंनी (Manoj Jarange Patil) मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही धारेवर धरले आहे. ‘राजकीय आरक्षण मिळावे यासाठीच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर जरांगे यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं आहे की,‘चंद्रकांत पाटील यांना सांगा, त्यांनी चांगलं काम केलं म्हणून आम्ही चांगलं बोललो. पण आता वचवच करू नये. त्यांना काय अक्कल आहे? त्यामुळेच त्यांना काढून टाकलंय. ‘चंद्रकांत पाटलांनी शांत राहावं, मराठ्यांच्या शिव्या खाऊ नये. चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून पडताळणी रोखली होती. कोल्हापूर म्हणजे आमच्याच राजघराण्याच्या कचाट्यात ते राहतात. त्यामुळे पाटील यांनी जास्त बोलू नये. शांत राहावे. जास्त बोलले तर, त्यांचा गेम वाजवला म्हणून समजा’, असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube