Download App

‘आधीच्या सरकारमध्ये पाणबुडी काय असते हे ठाऊक नसणारे पर्यटन मंत्री…’; केसरकारंची आदित्य ठाकरेंवर टीका

  • Written By: Last Updated:

Deepak Kesarkar : गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये एकामागून एक असे प्रकल्प नेले जात आहेत. हे कमी की काय म्हणून आता आता सिंधुदुर्गातील पर्यटनाचा मोठा प्रकल्प गुजरातमध्ये पळवला. वेंगुर्ले येथील निवती रॉक येथे पाणबुडी पर्यटन प्रकल्प (Submarine Tourism Project) होणार होता; मात्र आता हा प्रकल्प द्वारका येथे होणार असल्याचे वृत्त आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, वैभव नाईक आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यावर प्रतिक्रिया देतांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी माजी पर्यटनमंत्र्यांना जबाबदार धरलं.

Maharashtra New DGP : पोलिस महासंचालक रजनीश सेठ निवृत्त; विवेक फणसळकर यांच्याकडे कार्यभार 

2018 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पर्यटन विकासासाठी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यामध्ये देशातील पहिली पाणबुडी सिंधुदुर्गात उपलब्ध करून देण्यात येणार होती. पण, हा प्रकल्प आता गुजरातमधील द्वारका येथे होणार आहे. यावर बोलतांना पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले की, 2018 मध्ये मी अर्थ राज्यमंत्री असताना हा प्रकल्प महाराष्ट्रात आणला होता. दुर्दैवाने 2019 मध्ये महाराष्ट्राला असे पर्यटन मंत्री मिळाले, ज्यांना पर्यटन म्हणजे काय हे माहित नव्हतं. त्यांच्या काळात हा प्रकल्प रखडला. त्याच्याशी अनेकदा चर्चा केली. ते म्हणायचे, ‘हा पाणबुडी प्रकल्प आहे, ती पाण्यात बुडाली तर काय?’ अशी त्यांच्या मनात शंका होती. मुळात पाणबुडी पाण्यात बुडवण्यासाठी म्हणजे खोलवर जाण्यासाठी असते, हे त्यांना माहीत नसावे, अशा शब्दात केसरकरांनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

ज्यांनी राम नाकारला त्यांचा पराभव झाला, रामजन्मभूमीच्या मुख्य पुजाऱ्यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर 

केसरकर पुढं म्हणाले, सिंधुदुर्गात असलेले समुद्री विश्व किंवा ज्याला प्रवाळ म्हणतात, ते इतर कोठेही इतकं चांगलं नाही. त्यामुळे पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्गातच होईल. आपला प्रकल्प पाहून केरळ आणि गुजरातनेही अशाच प्रकारच्या पाणबुड्या बुक केल्या आहेत. प्रत्येक राज्याला आपल्या राज्यात काही उपक्रम राबवायचे आहेत, याचा अर्थ प्रकल्प हातातून गेला, असं होत नाही. सुदैवाने आता आपल्याकडे चांगले पर्यटन मंत्री आहेत. हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल, असं केसरकर म्हणाले.

महाराष्ट्रातून 17 महत्त्वाचे प्रकल्प गुजरातमध्ये गेले – राऊत
आतापर्यंत महाराष्ट्रातून 17 महत्त्वाचे प्रकल्प गुजरातमध्ये गेले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तोंड शिवून बसले. टेस्ला गेला, पाणबुडी प्रकल्पही गेला, हिरा व्यवसायही सुरतला गेला, त्याआधी वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पही गेला. याला लुटमार म्हणतात. केंद्र सरकारची गुजरातसाठी वाटमारी सुरू असून वाटमारी करणाऱ्यांवर दहशतवादविरोधी गुन्हे दाखल करावेत. या केंद्र सरकारच्या दहशतीवर हिंदुत्ववाजदी, मोदीभक्त सरकार बोलायलाही तयार नाही. महाराष्ट्र आणि मुंबईची वाट लाण्याचे धोरण असणाऱ्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलण्याचा अधिकार नाही, असे राऊत यांनी ठणकावले.

 

follow us