राजकीय वैरातून माझ्यावर केस करण्यात आली होती; कारावासाच्या शिक्षेनंतर काय म्हणाले कोकाटे?

Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना (Manikrao Kokate) नाशिक जिल्हा न्यायालयानं (Nashik District Court) दोन वर्षांनी शिक्षा सुनावली. मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तावेज देऊन लाटल्याचा कोकाटेंवर आरोप करण्यात आला होता. आता या प्रकरणात न्यायालयाने माणिकराव कोकाटेंसह त्यांचे बंधू सुनील कोकाटेंना (Sunil Kokate दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळं कोकाटेंच्या अडचणीत वाढ झली. दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता कोकाटेंची पहिली पहिली प्रतिक्रिया समोर आली.
अमेरिकेत अवतरणार ‘सुंदरी’! अमृता आणि आशिषच्या अदाकारीने सजणार नृत्य मैफिल
माणिकराव कोकाटेंनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, ही राजकीय केस होती. गेल्या 30 वर्षांपूर्वी ही केस दाखल झालेली आहे. त्यावेळी दिघोळे हे राज्यमंत्री होते. माझे आणि त्यांचे राजकीय वैर होते. या वैरात्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावर ही केस केली होती. त्या केसचा निकाल आज 30 वर्षांनंतर पहिल्यांदा लागला आहे. निकाल पत्र हे चाळीस पानांचे असून मी अद्याप वाचले नाही. ते वाचल्यानंतर त्याबाबत माहिती देईल. निकालाविरोधात अपील करण्याची निर्णय मी घेतला असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचं कोकाटे म्हणाले.
मी रितसर जामीन घेतला…
पुढं ते म्हणाले, मी राजकारणात जेव्हा प्रवेश केला होता, तेव्हाचे हे प्रकरण आहे. त्यावेळी मी आमदार सुध्दा होतो की नाही, मला माहित नाही. तो काळ आणि आजच्या काळात फरक आहे. नंतरच्या काळात दिघोळे आणि माझ्यात सलोख्याचे संबंधपण निर्माण झाले. परंतु, एखादी केस नोंदवल्यानंतर नियमान्वये प्रक्रिया होत असते. उशीरा प्रक्रिया झाल्यामुळं आज निकाल लागला, असं कोकाटे म्हणाले. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर मी रीतसर जामीन घेतला आहे, असा दावाही कोकाटेंनी केला.
धनंजय मुंडे अंजली दमानियांना कोर्टात खेचणार! फौजदारी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
उच्च न्यायालयात दाद मागणार..
आता हे प्रकरण समोर आल्यानंतर माझ्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते. राजकीयदृष्ट्या, देशात अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत. एक नागरिक म्हणून मला न्याय मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळं मी उच्च न्यायालयात न्याय मागणार असल्याचं कोकाटेंनी सांगितलं.