‘आम्ही आरक्षण देणार, फक्त जरांगेंनी मुंबईला…’; मंत्री उदय सामतांचं आवाहन काय?

  • Written By: Published:
‘आम्ही आरक्षण देणार, फक्त जरांगेंनी मुंबईला…’; मंत्री उदय सामतांचं आवाहन काय?

Uday Samant : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून लढा देत आहेत. मात्र, अद्यापही आरक्षणाचा तिढा न सुटल्यानं जरांगे पाटील मुंबईत उपोषण करणार आहेत. जरांगे पाटील यांनी आज मुंबईच्या दिशेने कुच केली. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मागे फिरणार नाही, असा निर्धार जरांगेंनी केला. दरम्यान, यावर आता उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी भाष्य केलं.

IND Vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का, मॅच विनर गोलंदाज कसोटी मालिकेतून बाहेर 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी असंख्य मराठा बांधव मुंबईच्या दिशने येत आहेत. जरांगे पाटलांच्या नेतृत्वात हा मोर्चा मुंबईकडे येतो आहे. याविषयी बोलतांना उदय सामंत म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांनी विचार करावा. आजवर त्यांनी ज्या ज्या सूचना केल्या, त्यावर सर्व सरकारने मान्य केल्या. त्यांच्या मागणीनुसार, निजामकालीन नोंदी शोधून काढल्या. राज्यभरातचं नव्हे तर राज्याबाहेर जाऊन जुन्या नोंदणी शोधल्या आहेत. आता आरक्षणाचा प्रश्न अंतिम टप्यात आहे, त्यामुळं त्यांनी सरकारला वेळ दिला पाहिजे. जरांगे पाटलांनी मुंबईकडे कुच केली आहे. पण, आरक्षण हे कायद्यानेच द्यावं लागेल. सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार आहेत. ते आरक्षण देतांना ओबींसीवंर अन्याय करणार नाही, असं सामंत म्हणाले.

Ayodhya Ram Mandir : रामललाच्या मूर्तीचा रंग सावळा का? जाणून घ्या त्यामागचं कारण 

सामंत म्हणाले, महसूल विभागाने जात प्रमाणपत्र देण्यसााठी जिल्ह्या जिल्ह्यात शिबीरं घ्या, अशी सूचना दिल्या आहेत. शिवाय, मागासवर्ग आयोग इंपिरिकल डेटा गोळा करत आहे. सर्वेक्षण सुरू आहे. आणि जर घरातच काही लोकं नसतील तर कसं सर्वेक्षण कसं होणार? त्यामुळं जरांगे पाटील यांनी थोडं समजून घ्यावं. त्या समाजावर अन्याय होणार नाही. आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहोत. त्यामुळं त्यांनी मुंबईला येणं टाळावं, असंही सामंत म्हणाले.

यावेळी सामंत यांनी दावोस दौऱ्याचा खर्चही मांडला. ते म्हणाले, दौऱ्यादरम्यान 3 लाख 72 हजार सामंजस्य करार करण्यात आले. या दौऱ्यात 17 कोटी 90 लाख 56 हजार 269 रुपये इतका खर्च झाला. मात्र, काहींना यंदा थंड हवेच्या ठिकाणी जायला न मिळाल्याने ते 40 कोटी खर्च झाला, अशी टीका करत आहे. त्यांना पोटशूळ झाला, असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचा मोर्चा लवकरच मुंबईत धडकणार आहे. या मोर्चाची धग कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, मनोज जरांगे आपल्या मागण्यावर ठाम आहेत. आता आरक्षण घेऊनच परत येऊ, असं जरांगे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube