मनसेची लोकसभेची तयारी अंतिम टप्प्यात : 14 जागांवरील संभाव्य उमेदवारांची यादीही समोर
मुंबई : राज्यात लवकरच आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांसह सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मागे राहिलेली नाही. अशात मनसेची (MNS) लोकसभा निवडणुकीसाठीची संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. लोकसभेच्या (Lok Sabha) 48 पैकी 14 जागांवर उमेदवारांची चर्चा झाली असून अंतिम निर्णय मात्र राज ठाकरेच घेणार असल्याचे सांगितले जात आहे. (MNS’s list of 14 potential candidates for the Lok Sabha elections has come out.)
लोकसभेसाठी मनसेचे संभाव्य उमेदवार
राजू पाटील, कल्याण
अभिजीत पानसे, ठाणे
बाळा नांदगावकर, दक्षिण मुंबई
नितीन सरदेसाई, दक्षिण मध्य मुंबई
संदीप देशपांडे, ईशान्य मुंबई
संजय तुर्डे, उत्तर मध्य मुंबई
गजानन राणे, उत्तर मुंबई
वागीश सारस्वत, उत्तर पश्चिम मुंबई
सुधीर पाटस्कर, बारामती
वसंत मोरे, पुणे
वैभव खेडेकर, रायगड
दिलीप धात्रे, सोलापूर
राजू उंबरकर, चंद्रपूर
डॉ. प्रदीप पवार, नाशिक
भाजपमध्ये ब्राह्मणांवर अन्याय होतोय का ? सुनील देवधरांचे थेट उत्तर
लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचा खास प्लॅन
आगामी निवडणुकांसाठी मनसेने बैठकांचा धडाका लावला आहे. या आगामी लोकसभा निवडणुकीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नुकतेच भाष्य केले होते. आगामी निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात वॉर रुम उभारणार आहोत. या निवडणुकीसाठी पक्षातील नेत्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. लोकसभेसाठी कुणाला उमेदवारी द्यायची या संदर्भात चर्चा झाल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले होते.
मनसे स्वबळावर लढविणार की युतीमध्ये?
राज्यात एकीकडे सत्ताधारी भाजप-शिंदे-राष्ट्रवादी(अजित पवार गट) यांची महायुती असून दुसरीकडे महाविकास आघाडीमधील काँग्रेस-राष्ट्रवादी-ठाकरे गट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्या पक्षासोबत युती करणार की स्वबळावर निवडणुका लढवणार? याबाबत अद्याप अस्पष्टताच आहे. मागील इतिहास पाहता अद्याप तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोणत्याही पक्षासोबत युती करुन निवडणूक लढवलेली नाही.
साडेचार लाख वेतन, विमान प्रवास अन् बरंच काही… मराठा आरक्षण सल्लागार मंडळाला ‘क्लास वन’ सुविधा
मात्र त्याचवेळी मनसे आणि शिवसेना शिंदे गटाची जवळीक वाढल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या सातत्याने भेटीगाठी होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. आगामी लोकसभा , विधानसभा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीत एक ठाकरे आपल्या सोबत असावेत हे शिंदेंना वाटत असल्याचे सांगितले जात आहे.